Brain Teaser : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे किंवा बुद्धिमत्ता चाचणीचे अनेक व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ किंवा फोटोतील प्रश्न इतके कठिण असतात की सोडविणे अशक्य होते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बुद्धमत्ता चाचणीचा एक प्रश्न दिसत आहे. यात गणिताचं कोडं आपल्याला सोडवायचे आहे. अनेक जणांचा गणित हा प्रिय विषय असतो. त्यांना हे कोडं सोडवणे, सोपी जाऊ शकते.
व्हायरल व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओमध्ये बुद्धीमत्ता चाचणीचा एक प्रश्न दिसत आहे. व्हिडीओमध्ये लिहिलेय, “या बुद्धीमत्ता चाचणीमध्ये ९५ टक्के लोकं अपयशी ठरतील.१+१= ९, २+४=१५, ३+३=२१, मग ४+४ = किती?” हे गणिताचं कोडं आपल्याला सोडवायचं आहे.
prime_maths_quiz या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जर तुम्ही सोडवू शकला नाही तर दुसऱ्यांना पाठवा”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी या प्रश्नाचे उत्तर सांगितले आहेत. एका युजरने लिहिलेय, “१२” तर एका युजरने लिहिलेय, “३१” काही युजर्सनी “२९” उत्तर असल्याचे लिहिलेय तर काही युजर्सनी “२७” उत्तर असल्याचे लिहिलेय.
हेही वाचा : VIDEO : चिमुकला चक्क अजगराबरोबर खेळतोय; पाहून नेटकरी संतापले, व्हिडीओ होतोय व्हायरल
खरे उत्तर
या प्रश्नाचे उत्तर खूप सोपी आहे. याचे खरे उत्तर २७ आहेत. तुम्ही म्हणाल कसे तर जाणून घेऊ या. १+१= ९, २+४=१५, ३+३=२१ या मध्ये येणाऱ्या उत्तरांमध्ये सहाचा फरक आहे. ९ ते १५ मध्ये सहाचा फरक आहे तर १५ ते २१ मध्ये सहाचा फरक आहे त्यामुळे २१ आणि २७ मध्ये सहाचा फरक असतो त्यामुळे याचे उत्तर २७ आहे.