Extramarital Affair video:  नवरा-बायकोचं नातं हे केवळ सामाजिक बंधन नसून, प्रेम, विश्वास आणि निष्ठेचा पायावर उभं असतं. मात्र या नात्यामध्ये जर कुणी एकजण फसवणूक करू लागला, विवाहबाह्य संबंध ठेवू लागला, तर त्या पवित्र नात्याला गळती लागते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, एका पत्नीनं आपल्या नवऱ्याच्या प्रेयसीला रस्त्यावरच रंगेहात पकडून अक्षरशः चोप दिला. हा थरारक प्रसंग पाहून नेटकरी देखील हैराण झाले आहेत. विश्वासघाताची ही कहाणी आणि पत्नीचा संताप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आणि प्रतिक्रिया मिळवत आहे.

सध्या विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच एका व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवली आहे. नवऱ्याने परक्यास्त्रीशी संबंध ठेवावा, हे कोणत्याही पत्नीसाठी दुखःदायक असतं. या व्हिडीओत एका पत्नीने आपल्या नवऱ्याच्या प्रेयसीला भररस्त्यात पकडून तिला जबरदस्त चोप दिला आहे. तिने अशा रागाने तिच्यावर हल्ला चढवला की, बघणाऱ्यांच्या अंगावर काटा आला.

नेमकं काय घडलं?

हा प्रकार नेमका काय घडला? तर, एका महिलेने आपल्या पतीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळताच थेट त्या प्रेयसीला पकडून रस्त्यावर चोपायला सुरुवात केली. व्हिडीओमध्ये दिसतं की, प्रेयसी घाबरून हात जोडून “माफ करा ताई, चूक झाली” असं म्हणत होती. पण बायकोचा राग इतका उफाळून आला होता की, तिने तिचे केस पकडून एकामागोमाग एक थप्पड लगावत तिला भर रस्त्यात झोडपलं.

तिने स्पष्टपणे सांगितलं, “मी तुला एकदा समजावलं होतं. दुसऱ्यांदा क्षमा केली. पण तू थांबलीस नाहीस. माझ्या नवऱ्याशी पुन्हा बोललीस. आता भोग त्याची शिक्षा.” या सीनवर आजूबाजूचे लोक स्तब्ध झाले. कोणी मोबाइलमध्ये व्हिडीओ शूट करत होते, तर कोणी त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत होते. पण संतापलेली पत्नी थांबायच्या मनःस्थितीत नव्हती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स (पूर्वीचा ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, लाखोंनी तो पाहिला आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजर म्हणतो, “ताई सोडून द्या, मरून जाईल ती.” दुसरा लिहितो, “असंच व्हायला हवं अशा लोकांसोबत.” तर एकाने म्हटलं, “पतीला पण शोधून त्यालाही असाच धडा शिकव!” या व्हिडीओने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला असून नेटकरीही यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया मांडत आहेत.