Chinese couple gets married at dog shelter Viral Photo : लग्न आयुष्यातला खास दिवस असतो. काही जणांना अगदी ड्रीम वेडिंग करायचे असते. पण, आज कालची मंडळी थाटमाट लग्न करण्यापेक्षा अगदी कमी माणसांमध्ये, मंदिरात किंवा अगदी कोर्ट मॅरेज करण्याला पसंती दाखवतात. तर आज तसेच काहीतरी पण थोडे आगळेवेगळे लग्न चीनमध्ये पाहायला मिळाले आहे. एका चीनच्या जोडप्याने भटक्या श्वानाच्या निवारागृहात (शेल्टरमध्ये) लग्नगाठ बांधली आणि सोशल मीडियावर सगळ्यांची मने जिंकली आहेत.

लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीत २०० हून अधिक भटक्या श्वानांचा समावेश होता. तर आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, नक्की या जोडप्याने काय केलं असेल. तर ३१ वर्षीय यांग एकेकाळी एक यशस्वी बांधकाम उद्योजक होता. पण, २०२० मध्ये त्याला व्यवसायाला भरपूर मोठं नुकसान झालं. त्यामुळे व्यवसायांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पैसे देण्यासाठी घर, दोन कार विकल्या आणि त्यांना पैसे दिले; असे साउथ चायना मॉर्निंग पोस्टने वृत्त दिले आहे. यांगने त्याच्या बालपणात, आजारपणामुळे पाच पिल्ले गमावली होती. मग त्यानंतर त्याने भटक्या श्वानांना वाचवण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी स्वतःला समर्पित केले. त्याने बचत केलेल्या पैशातून श्वानांसाठी निवारागृह उघडले. त्याने सुरुवातीला फक्त १० भटक्या प्राण्यांना घेऊन हे निवारागृह सुरु केले होते.

श्वानांच्या निवारागृहाला मदत करण्यासाठी स्वयंसेवकांचे एक नेटवर्क तयार केले. २०२२ मध्ये, २५ वर्षीय विद्यापीठाचा विद्यार्थी झाओ स्वयंसेवक याने श्वानांचे अन्न खरेदी करण्यासाठी दान केले. आतापर्यंत २०० भटके श्वान आणि त्यांना संभाळणारे ८ हजार स्वयंसेवक सुद्धा आहेत. त्यानंतर यांग, झाओ यांच्या प्रेमात पडले. दोघांचीही भटक्या श्वानांना वाचवण्याच्या मोहिमेसाठी एकत्र काम केले. तीन वर्षे एकत्र राहिल्यानंतर या जोडप्याने २५ मे रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तसेच नवल म्हणजे लग्नाचे ठिकाण म्हणून आश्रयस्थान कारण – श्वान त्याच्या खास दिवसाचा भाग असणे महत्वाचे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोस्ट नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हे अनोखे लग्न पाहून “लग्नाचे सगळ्यात बेस्ट ठिकाण”, “श्वानाचे आशीर्वाद तुमच्या दोघांबरोबर आयुष्यभर राहतील”, “आत्तापर्यंतचे सगळ्यात बेस्ट लग्न” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.