scorecardresearch

Premium

कपडे घडी करण्याचा कंटाळा येतोय? मग चिमुकल्याची ‘ही’ टेक्निक करा फॉलो; झटपट होतील कपड्यांच्या घड्या

folding clothes easy techniques: चिमुकल्याची कपडे घडी घालण्याची ही निंजा टेक्निक सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

children folding clothes easy techniques
चिमुकल्याची कपडे घडी घालण्याची निंजा टेक्निक सोशल मीडियावर खूप व्हायरल (photo – youradventuregram instagram)

कपड्यांच्या घड्या घालणे हे काम खूप कंटाळवाणे असते. रोज लहान-मोठे असे सर्व कपडे तीन-चार फोल्ड करीत नीट घड्या घालून मग ते व्यवस्थित कपाटात ठेवायचे. हे काम करण्यासाठी खूप पेशन्स लागतात. अनेकांना कपडे घडी करण्याचा खूप कंटाळा येतो. अशा वेळी ते कपडे घडी न करताच तसेच कपाटात कोंबून ठेवतात. तुम्ही याच प्रकारातले असेल आणि तुम्हालाही रोज कपडे घडी करण्याचा कंटाळा येत असेल, तर या चिमुकल्याचा व्हिडीओ एकदा बघाच.

यात एक चिमुकला अगदी सोप्या पद्धतीने आणि स्पीडने कपडे कसे घडी करायचे हे दाखवत आहे. त्यात त्याने अवघ्या काही सेकंदांत आपले कपडे (टी-शर्ट, पॅन्ट) घडी केले आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अगदी ४-५ वर्षांचा लहान मुलगा कागदी पुठ्ठ्याच्या मदतीने कपडे घडी करतोय. कपड्यांची घडी नीट घालण्यासाठी त्याने कागदी पुठ्ठा एका खास पद्धतीने कापला आहे. तो पुठ्ठ्याच्या मध्यभागी कपडे ठेवायचा आणि पुठ्ठ्याला पकडून तो आजूबाजूने कपडे नीट फोल्ड करायचा. बस्स… एवढं झाल्यानंतर कपड्यांची घडी नीट तयार. या पुठ्ठ्याच्या मदतीने चिमुकला अवघ्या काही सेकंदांत कपडे नीट घडी घालतोय.

Jugadu Women Made Sandwich Without Bread or Maida Use Dosa Batter In Toaster With Cheese Unique Breakfast Recipe Idea
डोक्याचा पूर्ण उपयोग! मैद्याच्या ब्रेडशिवाय बनवलं डोश्याचं क्लब सँडविच, तुम्हाला प्रयोग कसा वाटतोय बघा
children make sky cradle with Jugaad and Enjoy in the ride of Sky Cradle video goes viral
आनंद पैशाने विकत घेता येत नाही! चिमुकल्यांनी लुटला आकाशपाळण्यात बसण्याचा आनंद; जुगाड व्हिडीओ बघाच…
Uttarakhand riots
उत्तराखंडमध्ये दगडफेक, ५० पोलीस जखमी, दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश, मध्यरात्री काय घडलं?
Is it dangerous to get married with man working and live abroad
नातेसंबंध: परदेशी राहण्याचा हव्यास घातक?

हा व्हिडीओ @earthafterparty नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; जो आता तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ४० हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत; तर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. हा चिमुकला ज्या पद्धतीने कपड्यांची घडी घालतोय ते पाहून युजर्स त्याचे कौतुक करीत आहेत. कपडे घालण्याची ही अनोखी पद्धत आणि स्पीड यामुळे व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cloth folding hacks viral have trouble folding clothes with trick it will be solved in a moment the children folding clothes easy techniques sjr

First published on: 30-09-2023 at 14:01 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×