सोशल मीडियावर कपल्सचे अनेकदा व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ पाहून आजच्या तरुण पिढीने सगळीच लाज सोडली आहे का असाच प्रश्न पडतो. दिवसाढवळ्या कपल्स अश्लील चाळे करत असतात, त्यांना आजूबाजूचं भानदेखील नसतं. रस्त्यावर, ट्रेनमध्ये सार्वजनिक ठिकाणी हे कपल्स आपल्या मर्यादा ओलांडतात. अशाने त्यांच्याबरोबर दुसऱ्यांनाही त्रास होऊ शकतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये प्रेयसी थेट प्रियकराला मिठी मारून चालत्या बाईकवर बसली आहे.

रस्त्यावर अशा गोष्टी करणे म्हणजे वाहतूक नियमाचं उल्लंघनदेखील आहे. भररस्त्यावर धावत्या बाईकवर रोमान्स करत वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी अनेक बाईकस्वारांवर कारवाईही केली. मात्र, पोलिसांचा धाक या प्रेमी युगुलांवर दिसून येत नाही आहे. सध्याचा हा व्हिडीओ याचच एक उत्तम उदाहरण आहे असं म्हणू शकतो.

कपल्सचा रोमान्स व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ एका चालत्या कारमधून रेकॉर्ड करण्यात आला आहे, ज्यामध्ये बाईकवर बसलेल्या कपल्सचा धोकादायक स्टंट दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की मुलगा बाईक चालवतोय, तर मुलगी बाईकच्या टँकवर उलटी बसून मुलाला मिठी मारत आहे. रात्रीच्या वेळी असा धोकादायक स्टंट करत हे कपल स्वत:सह दुसऱ्यांचा जीवही धोक्यात घालताना दिसत आहेत.

कपलचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ @parivartan_news या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला “काय रे देवा! या जोडप्याने तर हद्दच केली…” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल नऊ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “दोघांनापण पकडून समान शिक्षा करा.” तर दुसऱ्याने “याचा वाहन परवाना जप्त करावा… यांना अटकही झाली पाहिजे”, अशी कमेंट केली. तर एकाने कमेंट करत लिहिलं, “लांबच्या प्रवासात झोप येते म्हणून हल्ली असं करतात, हे आजकाल खूप ठिकाणी होत आहे.”