Crow Playing Football Viral Video : सोशल मीडियावर प्राणी, पक्ष्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे लोकांनाही फार आवडतात. सध्या एका कावळ्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून सर्वच चकित झालेत. तुम्ही याआधी बोलणाऱ्या कावळ्याचा व्हिडीओ पाहिला असेलल; पण आता चक्क फुटबॉल खेळणाऱ्या कावळ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात कावळा एका मुलासह आनंदाने फुटबॉल खेळताना दिसतोय. हा व्हिडीओ दक्षिण गोव्यातील असल्याचे म्हटले जातेय. दरम्यान, कावळा आणि मुलातील ही मैत्री पाहून लोकही आश्चर्य चकित झालेत.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगा घराच्या अंगणात चक्क कावळ्याबरोबर फुटबॉल खेळण्याचा आनंद घेत आहे. तो हळुवारपणे कावळ्याच्या दिशेने लाथेने फुटबॉल मारतो. त्यानंतर कावळा चोचीने तो फुटबॉल मुलाकडे परत पाठवतो. दोघांमध्ये हा खेळ काही वेळ सुरू असतो. त्यातून असे दिसते की, जणू काही दोन मित्र फुटबॉलच्या मैदानावर एकमेकांसह सराव करतायत.
हे दृश्य केवळ ह्रदयस्पर्शीच नाही, तर यातून पक्षीदेखील मानवी भावना समजून घेत त्यांच्याशी जोडले जाऊन शकतात हे दर्शवते. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर आता चांगलाच व्हायरल होतोय, ज्यावर लोकही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.
विवारी कावळ्याला वेळ आहे का? युजरचा मिश्किल सवाल
फुटबॉल खेळणाऱ्या कावळ्याचा हा अनोखा व्हिडीओ @chakdefootball नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘एका दुर्मीळ व्हिडीओमध्ये गोव्यात एक कावळा एका मुलासह फुटबॉल खेळताना दिसतो. किती सुंदर दृश्य आहे.’ हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स विविध कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले, “रविवारी कावळ्याला वेळ आहे का? आम्हाला अशा स्ट्रायकरची गरज आहे, जो हेडदेखील करू शकेल.” तर दुसऱ्याने म्हटले, “मुलगा आणि कावळ्यातील ही मैत्री भारी आहे.” तर शेवटी एकाने लिहिले, “गोव्यात फुटबॉलच एक भारी खेळ आहे.”