प्रत्येक स्त्रीसाठी तिचं कुटंब म्हणजे सर्वस्व असते. लग्नानंतर नवऱ्याबरोबर त्याचं कुटुंब तिचं कुटुंब होते. सासू-सासरे, दीर-नणंद-भावजय, मुलं-बाळा प्रत्येक नवीन नातं ती मनापासून जपते. आजच्या काळात जिथे नोकरी करत घर आणि संसार सांभाळताना स्त्रियांना तारेवरची कसरत करावे लागते. पण आजही कित्येक महिला ही जबाबदारी आनंदाने पार पाडतात. नोकरी-व्यवसायाबरोबर घर-संसार-कुटंब सर्व काही सांभाळतात. प्रत्येक सण-उत्सव-सोहळा उत्साहात साजरा करतात. आपल्या कुटुंबाची आणि आपली प्रत्येक छोटी मोठी हौस पूर्ण करतात. अशाच एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सासू साऱ्यांच्या ५० व्या लग्नाच्या वाढदिवसी उत्साहात नाचणाऱ्या महिलेचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

sawant_sonali_ नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. इंस्टाग्राम अकाउंटनसार, सोनाली या कोल्हापूरमध्ये पतीबरोबर स्वत:चे हॉटेल चालवणाऱ्या मराठी उद्योजिका आहेत. कुटंब आणि घराची जबाबदारी पार पडणाऱ्या आपल्या सासू सासऱ्यांच्या ५०व्या लग्नाच्या वाढदिवशी लग्नसोहळा उत्साहात साजरा केला आहे. सासू सासऱ्यांच्या लग्नात करवलीप्रमाणे मिरवणाऱ्या या सुनबाईने खास डान्स देखील केला.

हौशी सुनबाईंनी पतिबरोबर केलेला भन्नाट डान्सचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. साऊथच्या वीलनवानी एंट्री करतो नावाच्या गाण्यावर सुनबाईंनी भन्नाट डान्स केला आहे.

गाण्याचे कडवे

गॉगल डोळ्याला सोनं गळ्याला
त्याचा रुबाब थेट काळजात शिरतो
साऊथच्या वीलनवानी एंट्री करतो
जानू माझा लाल स्विफ्ट घेऊन फिरतो

नेटकरी काय म्हणाले

इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहले आहे की, “आई पप्पा (सासू साऱ्यांच्या) लग्नाच्या ५०व्या वाढदिवसाच्या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्याची संधी आम्हाला मिळाली आई पप्पा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”

अनेकांनी कमेंट करत डान्सचे कौतुक केले आहे. व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले,”खूप छान ताईसाहेब”

दुसऱ्याने लिहिले की, “लय भारी”

तिसऱ्याने लिहिले की, “खूप चांगला डान्स केला”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौथ्याने लिहिले की,” १५ वेळा बघितलेला व्हिडिओ खूप चांगला आहे.”