Viral Video : पिझ्झा हा पदार्थ अगदी सगळ्यांचा लाडका आहे. घरी जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल किंवा मित्र-मैत्रिणींचा वाढदिवस असेल, तर आपण लगेच पिझ्झा ऑनलाइन ऑर्डर करतो आणि त्याचा आनंद लुटतो. तर आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ पाहायला मिळाला आहे. पिझ्झा कापण्याची एक खास ट्रिक व्हायरल होत आहे. पिझ्झाच्या सहा स्लाइसच्या मधोमध ठेवण्यात येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या टेबलचा अनोखा वापर एका युजरने दाखवला आहे; जो तुम्हाला विचार करायला नक्कीच भाग पाडेल. एका युजरने पिझ्झाचे स्लाइस वेगवेगळे करण्यासाठी पांढऱ्या छोट्या टेबलचा (Pizza saver / Pizza stool) उपयोग केला आहे. युजर सुरुवातीला पिझ्झाचा बॉक्स उघडतो. त्यानंतर अगदी मधोमध ठेवलेला पांढऱ्या रंगाचे पिझ्झा टेबल उचलून, तो सहा स्लाइसमधील एका तुकड्यावर ठेवतो आणि मग दुसऱ्या हाताने बाजूचा पिझ्झाचा तुकडा अलगद वेगळा करतो. अशा खास पद्धतीने पिझ्झाचा स्लाइस अगदी व्यवस्थित वेगळा करण्यात आला आहे. छोटे पांढरे पिझ्झा टेबल पिझ्झा कापण्यासाठी किती उपयुक्त आहे हे एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच. हेही वाचा… Video: प्राणीप्रेमी! श्वान जोडप्याचे थाटामाटात केले ‘डोहाळजेवण’ व्हिडीओ नक्की बघा : https://www.instagram.com/p/CxZpeEOAkjJ/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again पिझ्झा स्लाइस वेगवेगळे करण्याची सोपी पद्धत : डॉमिनोजमधून (Domino's) जेव्हा तुम्ही पिझ्झा ऑनलाइन ऑर्डर करता तेव्हा पिझ्झाच्या अगदी मधोमध हे छोटे पांढरे टेबल ठेवलेले तुम्हाला दिसेल. बॉक्स उघडल्यानंतर हे पिझ्झा टेबल पाहिले की, आपण ते बाजूला काढून ठेवतो किंवा लहान मुले या टेबलचा खेळण्यासाठी वापर करतात. पण, युजरने त्या टेबलचा पिझ्झा कापण्यासाठी भन्नाट उपयोग केलेला दिसून येत आहे. इतक्या छोट्या टेबलचा उपयोग पिझ्झा कापण्यासाठी करण्यात येऊ शकतो याचा कोणी विचारसुद्धा केला नसेल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @rowheimfarooqui या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. 'डॉमिनोज'च्या एका कर्मचाऱ्याने ही सोपी पद्धत सांगितल्याचे युजरने कॅप्शनमध्ये स्पष्ट केले आहे. पिझ्झा स्लाइस कापण्याची ट्रिक 'रोहेम फारुकी' या युजरने व्हिडीओद्वारे दाखवली आहे. तसेच व्हिडीओ पाहून अनेक जण विविध प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून येत आहेत. काही जण म्हणत आहेत की, पिझ्झाच्या वर सजावट केलेले पदार्थ बॉक्सला लागू नयेत म्हणून हा टेबल ठेवण्यात येतो. तर, अनेक तरुणी हा टेबल बार्बीचा आहे; अशा कमेंट मजेशीर पद्धतीने करताना दिसत आहेत. तसेच अनेक जण ही ट्रिक खूपच उपयोगी आहे, असेसुद्धा म्हणताना दिसत आहेत.