scorecardresearch

मोबाईलच्या बॉक्सपासून बनवला स्विच बोर्ड, या देसी जुगाडाचा Video Viral

Desi Jugaad: या व्हायरल व्हिडीओ मधली ट्रिक पाहून तुम्हीही प्रयत्न करून बघा.

Desi Jugaad video
देसी जुगाडाचा व्हिडीओ व्हायरल (फोटो: IB Technical / YouTube)

Desi Jugaad: अनेक वेळा आपण रद्दीत, भंगारात पडलेल्या वस्तूंना फारसे महत्त्व देत नाही, पण नीट विचार केला तर त्याचाही योग्य उपयोग होऊ शकतो. भंगारात पडलेल्या गोष्टीपासून उपयोगी वस्तू बनवण्यासाठी कौशल्य लागते. एका व्हायरल व्हिडीओमध्ये देसी जुगाडच्या मदतीने मोबाईलच्या डब्याला स्वीच बोर्ड बनवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमच्या घरात पडलेला बॉक्सचा वापर करायला आवडेल.

मोबाईल बॉक्सचा वापर

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्हीही तुमच्या घरात पडलेल्या मोबाईल बॉक्सचा योग्य वापर करू शकता. मोबाईल कंपार्टमेंटच्या आत जागा आहे, ज्यामध्ये स्विचेस आणि वायर्स सहजपणे एकत्र केले जाऊ शकतात. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, त्या व्यक्तीने मोबाईलच्या बॉक्समधून एक स्विच बोर्ड तयार केला आहे.

(हे ही वाचा: सुंदरबनमधील वाघाचा बोटीतून उडी मारतानाच हा Viral Video एकदा बघाच!)

(हे ही वाचा: Optical Illusion: धबधबा आहे की पांढरे कपडे घालून उभे असलेले लोक? उत्तरात दडले आहे रहस्य)

व्हिडीओ पाहून यूजर्स झाले आश्चर्यचकित

दिसायलाही हा स्विच बोर्ड खूपच फंकी लुक देत आहे. हा देसी जुगाड पाहून लोक त्याचे या देसी जुगाडचं कौतुक करत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने ‘ओह माय गॉड’, तर दुसऱ्या यूजरने ‘मोबाईल बॉक्सचा योग्य वापर’ असे लिहिले. हा व्हिडीओ आयबी टेक्निकल नावाच्या अकाऊंटने यूट्यूबवर शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये ‘मोबाईल बॉक्सचे एक्स्टेंशन बोर्ड कसे बनवायचे’ असे लिहिले आहे. सोशल मीडियावर लोक या व्हिडीओला खूप पसंत करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Desi jugaad switch board made from mobile box try it yourself by trying the trick ttg