आनंद दिघे आणि ठाण्याचं एक वेगळंच नातं आहे. त्यांनीच सर्वप्रथम टेंभी नाक्यावर जय अंबे संस्था स्थापन करून नवरात्र उत्सवाची स्थापना केली, ती आज तागायत चालूच आहे. आनंद दिघे एकोपा निर्माण करुण जसे सन साजरे करायचे तोच एकोपा अजूनही ठाण्यात जीवंत आहे. अशातच नवरात्री उत्सवात टेंभी नाका येथील देवीच्या दर्शनासाठी अचानक आनंद दिघे आले अन् त्यांना पाहायला गर्दी झाली. ठाण्याच्या टेंभीनाक्यावर आरमाडा गाडी थांबली आणि आनंद दिघे बाहेर पडताच सगळ्यांच्या अंगावर शहारा उमटला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आनंद दिघे ज्या आरमाडातून प्रवास करायचे अगदी हुबेहूब तशीच. अशातच भगवी वस्त्रं परिधान केलेले दिघे साहेब जणुकाही अवतरले. सर्व वातावरण एकदम शांत झालं. आनंद दिघे हे ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरातच लहानाचे मोठे झाले. शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर दिघेंनी कार्यालयातच राहायला सुरुवात केली. “ठाण्यातील टेंभी नाक्यावरील त्यांचे घर म्हणजेच आनंदआश्रम. आनंद दिघे ठाण्यात आले त्यांनी देवीची आरती केली, लहानग्यांना आशिर्वादही दिला.

दरम्यान अभिनेता प्रसाद ओक याने दिघे यांच्या वेशात गर्दीतून एन्ट्री मारून आलेल्या भक्तांना आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा क्षेञप्रमुख हेमंत पवार व शाखाप्रमुख निखिल बुडजडे उपस्थित होते.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >> जेव्हा घरचे लव्ह मॅरेजसाठी तयार होतात; तरुणीला झालेला आनंद एकदा बघाच, VIDEO व्हायरल

साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आगामी धर्मवीर भाग दोनमधून समोर येणार असल्याचे तरडे व निर्माते मंगेश देसाई यांनी स्पष्ट केले.