असे तर सोशल मीडियावर बरेच चित्र-विचित्र फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो बघणाऱ्याला गोंधळात टाकतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल झाला आहे, जो एकदम हटके आहे. हा फोटो बघून तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडाल. या फोटोमध्ये एक मुलगी लपलेली आहे. परंतु तुम्ही सहजासहजी ही मुलगी शोधू शकत नाहीत. जरा डोक्याला ताण दिला की तुम्ही या मुलीला शोधण्यात यशस्वी ठरू शकता. जर तुम्ही या मुलीला शोधलं, तर तुम्ही बुद्धिमान ठराल.

या फोटोमध्ये आपण एक दगडी गेट पाहू शकतो. या गेटच्या आजूबाजूला बरीच झाडं आहेत. या झाडांना रंगीबेरंगी पानं आहेत. झाडाची पानं गळून जमिनीवर पडली आहेत. हे चित्र खूपच सुंदर आहे. या फोटोचे नीट निरीक्षण केल्यानंतर मुलगी नेमकी कुठे आहे हे तुम्ही शोधू शकाल. जर अजूनही तुम्हाला या फोटोमध्ये मुलगी कुठे लपली आहे हे समजत नसेल तर हा तुम्ही फोटो झूम करून पाहा.

Viral Video: पोलीस दिसताच दंड टाळण्यासाठी तरुणीने वाढवला स्कुटीचा वेग; त्यानंतर जे झालं ते पाहून हैराण व्हाल

पोलिसांनाही ‘कच्चा बादाम’ गाण्याची क्रेझ; डान्स करतानाचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अद्याप तुम्हाला ही मुलगी कुठे लपली आहे हे सापडत नसेल तर फोटोमध्ये जे झाड आहे त्याचे बारकाईने निरीक्षण करा. आपण फोटोमध्ये पाहू शकतो की ही मुलगी झाडाला टेकून बसलेली आहे. या मुलीच्या शरीरावर अशाप्रकारे पेंटिंग केलेलं आहे की आजूबाजूच्या परिसरात समरस झाली आहे. त्यामुळे मुलगी नेमकी कुठे लपली आहे हे सांगणं थोडं अवघड होतं.