Fuljhadi Making Viral Video : दिवाळी म्हटले की, रंगीबेरंगी कंदील, दिव्यांचा लख्ख प्रकाश, दारात रांगोळी, नाश्त्याला फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी, पाऊस, भुईचक्र, सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब, सुतळी बॉम्ब, आपटी बॉम्ब, पाऊस आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी फुलबाजी. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, हे फुलबाजे नक्की कशा प्रकारे बनवले जात असतील? नाही, तर मग आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुलबाजे कसे बनवतात हे बघायला मिळेल.

फुलबाजे बनवण्यासाठी सुरुवातीला तारांना माती लावून घेतली आहे. एका लाकडी फळीत या तारा बसवून नंतर ज्वलनशील घटकांचा (ॲल्युमिनियम पावडर, बोरिक ॲसिड व ऑक्सिडायझर) समावेश करून एक मिश्रण तयार करण्यात आले आहे. त्यानंतर पातळ तारांना एका साचात ठेवून, त्यांना जाडसर रासायनिक मिश्रणात बुडवले गेले आहे. एकदा नव्हे, तर ही प्रक्रिया दोनदा करण्यात आली. त्यानंतर त्या तारा उन्हामध्ये सुकायला ठेवल्या गेल्या आहेत. त्यानंतर तयार फुलबाजे बॉक्समध्ये पॅक करून ठेवले जात आहेत आणि नंतर विक्रीसाठी पाठवण्यात आले आहेत.

“प्रत्येक चमकणाऱ्या गोष्टीच्या मागे मेहनत असतेच” (Viral Video)

तुम्ही व्हिडीओत पाहिले असेल की, छोट्याशा बॉक्समध्ये मिळणारे फुलबाजे बनविण्यासाठी कामगारांना बरीच मेहनत करावी लागते. ही मेहनत करताना कोणतीही सुरक्षा किंवा कोणाच्याही हातात साधे ग्लोव्हजसुद्धा दिसत नाहीत. मिश्रण बनवतानासुद्धा उपकरणांचा वापर न करता, ते हाताने रसायने मिक्स करताना दिसत आहेत. त्यामुळे तुम्हालाही हे दृश्य पाहून काळजी वाटेल, एवढे तर नक्की… एकदा बघाच हे फुलबाजे नक्की कशा प्रकारे बनवले जातात…

व्हिडीओ नक्की बघा

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @thefoodiehat या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘अशा प्रकारे भारतात फुलबाजे बनवले जातात’,अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “आमच्या सणांमध्ये आनंद आणि लक्ख प्रकाश देणाऱ्या कामगारांचे आभार”, “त्यांना कोणीतरी हातात ग्लोव्हज घालायला द्या”, “प्रत्येक चमकणाऱ्या गोष्टीच्या मागे अनेक लोकांची खूप मेहनत असते. तुम्ही आपल्या मेहनतीने सणांचा आनंद आणखीन वाढवता. देव, तुम्हाला चांगलं आरोग्य आणि सुख देवो” आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.