Viral Video : फोन किंवा मोबाईल आज प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक बनलेला आहे अन्न, वस्त्र आणि निवारा या जशा माणसाच्या मूलभूत गरजा आहे तसेच फोन सुद्धा माणसाची एक अत्यंत महत्त्वाची गरज बनलेली आहे. फोन शिवाय माणूस पाच मिनिटे सुद्धा एकटा राहू शकत नाही त्यामुळे रस्त्याने जाताना, उठता, बसता, झोपता माणसाला हातात फोन हवा असतो. अनेकदा रस्त्यावर चालताना सुद्धा लोक समोर बघत नाही तर फोनमध्ये बघतात. काही वेळा फोनच्या नादात अपघात सुद्धा घडतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये रस्त्यावरून चालताना फोन वापरला तर कसे अपघात घडू शकतात हे दाखवले आहेत.

या व्हिडिओमध्ये फोन मुळे घडलेल्या अपघातांच्या काही घटना दाखवलेल्या आहेत पहिल्या घटनेत एक महिला फोन वापरत असताना थेट फाउंटेन वॉटर टब मध्ये पडते. पुढच्या घटनेत एक तरुण फोनच्या नादात झाडाला जाऊन आपटतो. त्यानंतरच्या एका घटनेत एक महिला फोनच्या नादात बाकावर झोपलेल्या सुरक्षारक्षकाच्या डोक्यावर बसते. पुढे एका घटनेत एक महिला चालताना फोन वापरताना असते आणि थेट स्ट्रीट लाईटला धडकते आणि खाली पडते. एका घटनेत एक तरुण फोन वापरत असताना एका पार्कमध्ये थेट पाण्याच्या टाकीत पडतो. एका घटनेत एक तरुण फोनच्या नादात रस्त्यावर जाऊन पडतो. आणखी एका घटनेमध्ये एक जण थेट खोल टाकीत पडतो. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना हसू येईल तर काही लोकांच्या अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडिओ चांगलाच पाहिला होता. जर तुम्ही रस्त्यावरून चालताना फोन वापरत असाल तर तुम्ही सुद्धा अशा अपघाताचे बळी पडू शकता.

हेही वाचा : VIDEO : “बायकोला I Love You म्हणा..” प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण कंजूसपणा का करतो? काकांनी दिला पुरुषांना सल्ला

पाहा व्हिडीओ

Figen या एक्स अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे, ” फोन अपघात” या व्हिडिओवर काही युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सने मजेशीर अपघाताचे व्हिडिओ शेअर केले आहेत. एका युजरने लिहिले आहे, ” खूप छान पद्धतीने सुरक्षा बाळगण्यास सांगितले.” तरी एका युजरने विचारलेय, ” शेवटच्या घटनेमधील व्यक्ती सुरक्षित आहे का ?” आणखी एका युजरने लिहिलेय, ” हे खूप भयानक आहे” काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले तर काही युजर्सनी फोनच्या अतिवापरावर संताप व्यक्त केला आहे.