मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबातील भावंडे यांच्याबरोबर अचानक फिरायला जायचे प्लॅन ठरतात. तेव्हा जीन्स घालायची की वनपीस, कोणती हेअरस्टाईल करायची असे अनेक प्रश्न तरुणींना पडतात; तर अशा वेळी काही सेकंदात झटपट होणाऱ्या हेअरस्टाईल तुम्ही ट्राय करू शकता. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एका युजरने क्लिपमध्ये रिबनचा उपयोग करून हटके बो (Bow) तयार केला आहे आणि केसांचे सौंदर्य वाढवले आहे. युजरने कशाप्रकारे रिबनचा उपयोग करून ही खास हेअरस्टाईल केली चला पाहूयात.
पुढीलप्रमाणे क्लिप आणि रिबनचा उपयोग करून तुमच्या केसांचे सौंदर्य वाढवा :




१. सगळ्यात पहिले तुम्ही नेहमी वापरत असणारा क्लिप घ्या.
२. त्या क्लिपला उघडून घ्या आणि त्याच्यामध्ये एक रिबन घाला.
३. त्यानंतर क्लिप बंद करा, तुम्हाला रिबनचे दोन्ही टोक बाहेर आलेले दिसतील.
४. नंतर या रिबनची गाठ बांधून घ्या, जी एखाद्या बो (Bow) प्रमाणे दिसेल.
५. त्यानंतर तुमचे केस विंचरून त्यावर हा क्लिप लावून घ्या, म्हणजे क्लिप लावून झाल्यावर हा बो (Bow) तुमच्या केसांचे सौंदर्य आणखीन वाढवेल. अशाप्रकारे क्लिपमध्ये रिबनचा उपयोग करून हटके बो तयार करा आणि केसात त्यांची रचना करून घ्या.
हेही वाचा…कसे बनवले जातात आपटी बॉम्ब? फटाका तयार करतानाचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “हे खूप धोकादायक आहे”
व्हिडीओ नक्की बघा :
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @laurenpiluso या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तुमच्या क्लिपचा उपयोग करून केसात रिबन लावण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग; अशी कॅप्शन या व्हिडीओला दिली आहे. युजरने दाखवलेली ही सोपी पद्धत खूपच उपयोगी आणि अनोखीसुद्धा आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांना ही कल्पना खूप आवडली आहे; असे ते कमेंटमध्ये सांगताना दिसत आहेत.