Viral Railway Electric Shock Video: रेल्वेस्थानकावर नशेत बुडालेला एक तरुण, डोळ्यात बेफिकिरी आणि मनात स्टंट करण्याचा वेडगळ उत्साह… समोरच उभी असलेली ट्रेन आणि त्यावरून जाणाऱ्या हाय व्होल्टेज तारांकडे तो रोखून पाहतो. आजूबाजूचे लोक आरडाओरड करत सावध करत असताना तो मात्र आपल्या जगात हरवलेला असतो आणि तेव्हाच घडतो एक असा थरारक क्षण, जो केवळ भयावह नव्हे तर अंगावर शहारे आणणारा आहे.

सोशल मीडियावर सध्या एक अंगावर काटा आणणारा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये नशेच्या भरात बुडालेला एक तरुण रेल्वेच्या हाय व्होल्टेज ओव्हरहेड वायरला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना दिसतो आणि त्यानंतर जे काही घडतं ते पाहून अनेकांचे हातपाय थरथरू लागले. एका क्षणी तो जसा तारेला स्पर्श करतो, तसा स्फोटासारखा आवाज होतो आणि तो तरुण आगीत होरपळतो. या व्हिडीओने सध्या संपूर्ण सोशल मीडियात खळबळ उडवली आहे.

सदर व्हिडीओमध्ये दिसतं की, एक तरुण रेल्वे इंजिनावर चढतो आणि उंचावरून स्टंट करत करत तारेला हात लावण्याचा प्रयत्न करतो. आजूबाजूचे प्रवासी त्याला वारंवार थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण तो कोणाचं ऐकत नाही. नशेत तो स्वतःच्या शरीरालाच विसरतो आणि हळूहळू तारेकडे सरकतो.

क्षणात झाला स्फोट! अंगावर काटा आणणारा क्षण

एक जण त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करत असतो आणि कॅमेऱ्यात टिपलं जातं ते भयावह दृश्य. ज्या क्षणी तो तरुण वायरला स्पर्श करतो, त्या क्षणी इतका जबरदस्त करंट बसतो की संपूर्ण परिसरात प्रकाशाचा स्फोट होतो, जणू काही बॉम्ब फुटल्यासारखी स्थिती निर्माण होते. काही सेकंदांसाठी स्क्रीन पूर्ण पांढऱ्या प्रकाशाने व्यापून जाते आणि तो तरुण खालच्या प्लॅटफॉर्मवर कोसळतो.

ही घटना पाहणाऱ्या लोकांच्या कंठात शब्द अडकतात, काही जण किंचाळतात, तर काही हातातलं सोडून पळ काढतात. व्हिडीओ पाहणारे नेटकरीही हादरलेत. एकाने कमेंट केली, “भाऊ, हाच का शेवट? एक सेकंदात गायब” तर दुसरा म्हणतो, “हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

ही घटना पहिलीच नाही. याआधीही अनेकांनी अशा स्टंटच्या नादात आपला जीव गमावलेला आहे. पण तरीही लोक इतक्या धोकादायक गोष्टी पुन्हा पुन्हा का करतात? हा प्रश्न कायम आहे. नशा आणि स्टंट दोन्हींचा शेवट जीवघेणा ठरू शकतो, हा धडा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही सुन्न व्हाल.