Ed Sheeran visited mumbai school : शाळेमध्ये प्रमुख पाहुणे आल्यावर विद्यार्थी त्यांच्यासाठी त्यांच्या नाजूकशा आवाजात मस्त गाणी, नाच करून अशा छोट्याशा कार्यक्रमाद्वारे त्यांचे कलागुण दाखवितात. मात्र, हा प्रमुख पाहुणा दुसरा-तिसरा कुणीही नसून, इंग्लिश गायक एड शिरीन असेल तर? सध्या सुप्रसिद्ध इंग्लिश गायक एड शिरीन हा त्याच्या कॉन्सर्टसाठी मुंबईमध्ये आला आहे. त्याच्या या दौऱ्यादरम्यान त्याने नुकत्याच मुंबईमधील एका शाळेला भेट दिली असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

एड शिरीनने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करताच, अगदी काही तासांतच तो तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओखाली त्याने, “आज सकाळी मुंबईच्या एका शाळेला भेट दिली आणि त्या मुलांबरोबर मजा-मस्ती करीत गाणी गायली. भारतात पुन्हा येऊन खूपच मस्त वाटत आहे!” अशी कॅप्शनदेखील लिहिली आहे.

हेही वाचा : वाह! WWE सुपरस्टार ‘जॉन सिना’ गातोय शाहरुख खानचे ‘हे’ गाणे! व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात, “खूपच विचित्र…”

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला, एड शिरीन लहान मुलांबरोबर जमिनीवर मांडी घालून बसला आहे आणि त्याच्यासमोर एका लहानशा स्टेजवर मुले गाणी म्हणत आहेत, असे दिसते. त्यानंतर एड शिरीन अगदी बालवाडीच्या मुलांपासून ते मोठ्या मुलांच्या वर्गांमध्ये जाऊन त्यांचे नाच-गाणे पाहतो. इतकेच नाही, तर स्वतः गिटार वाजवून त्याचे सुप्रसिद्ध ‘शेप ऑफ यू’ हे गाणेदेखील म्हणून दाखवीत असल्याचे त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकतो. सर्वांत शेवटी व्हिडीओ शूट करणारी एड शिरीनला “शाळेमध्ये मुलांबरोबर कसे वाटले,” असा प्रश्न विचारल्यावर, “मला सगळं खूपच आवडलं आहे. खूप मजा आली,” असे उत्तर देतो.

मुंबईच्या शाळेला जगप्रसिद्ध गायक एड शिरीनने भेट दिली. इतकेच नाही, तर मुलांबरोबर गाऊन, त्यांनी गायलेल्या गाण्याचे कौतुक केल्याचा व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियावर पोस्ट झाला तेव्हा नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या पाहू.

हेही वाचा : अरे डोळे दुखले रे! पॉर्नस्टार Johnny Sins रणवीर सिंगबरोबर मालिकेत करतोय काम; मिम्स पाहून व्हाल हैराण

“एक दिवस जेव्हा तुम्ही शाळेत जात नाही… तेव्हा असे काहीतरी घडते,” असे एकाने लिहिले आहे. “जेव्हा ही मुलं मोठी होतील तेव्हा त्यांच्याकडे सांगायला केवढा भारी किस्सा आहे हा!” असे दुसऱ्याने म्हटले. “भारतात स्वागत आहे”, असे तिसऱ्याने लिहिले आहे. “एखाद्या माणसाकडे किती साधेपणा आणि नम्रपणा असावा…”, असे चौथ्याने लिहिलेय. “जेव्हा एड मुलांबरोबर खाली मांडी घालून बसला तेव्हा त्याच्याबद्दलचा माझा आदर अजूनच वाढला आहे.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एड शिरीनने त्याच्या @teddysphotos या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून, त्याला काही तासांतच ३.८ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत. तसेच या व्हिडीओवर ३२०K कमेंट्स व ३,२२४ लाइक्स आले आहेत.