Elder man viral video: वर्षानुवर्षे प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल आपण अनेकदा ऐकतो आणि अशा घटना कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. आपल्या स्वार्थासाठी निर्दयी माणसं प्राण्यांचा गैरवापर करतात आणि काही विकृत लोकं तर हद्दच पार करतात. सध्या असाच धक्कादायक प्रकार एका ठिकाणी घडला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या घटनेत एका वयोवृद्ध माणसाने मादी श्वानाबरोबर विकृत कृती केली. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ…

विकृत माणसाचा व्हिडीओ व्हायरल

एका धक्कादायक घटनेत महाराष्ट्रातील नायगाव येथे एका वृद्ध व्यक्तीला मादी श्वानासह शौचालयात पकडण्यात आले. एका महिलेने एका बांधकाम साईटच्या शौचालयात श्वानासोबत या माणसाला रंगेहाथ पकडले. तिने आपल्या मोबाईल फोनवर ही घटना रेकॉर्ड केली आणि तो सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल झाला.

व्हिडीओमध्ये दिसणारी साधारण ६० वर्षीय व्यक्ती मादी श्वानाला शौचालयात घेऊन जात असल्याचे दिसत आहे. महिलेने वेळीच घटनास्थळी पोहोचून, त्या श्वानाला इजा होण्यापासून वाचवले. श्वानाला सार्वजनिक शौचालयात नेण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर ती त्या ठिकाणी गेली होती, असा दावा तिने केला.

हेही वाचा… त्याची एक चूक अन् चिमुकली आगीत अक्षरश: होरपळली; घरात लहान मुलं असणाऱ्या प्रत्येकानं पाहावा असा VIDEO

निष्पाप प्राण्याला न्याय मिळावा, अशी मागणी करीत महिलेने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या घटनेत सहभागी असलेल्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी प्राणीप्रेमी आणि कार्यकर्ते करीत आहेत.

पाल फाउंडेशन (@palfoundation.in) प्राणी कल्याण प्रतिष्ठानने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “नायगावमध्ये एका मादी श्वानाबद्दल क्रूरता – आम्ही न्यायाची मागणी करतो!” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.

हेही वाचा… ट्रकने धडक देताच दुचाकीने घेतला पेट, माणूस आगीत होरपळला अन्…, थरारक घटनेचा VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यात पुढे म्हटले आहे, “नायगाव येथील एका मादी श्वानाला सार्वजनिक शौचालयात नेल्याची घटना आमच्यापर्यंत पोहोचली आहे. तिने ज्या त्रासाचा सामना केला, त्या आपण व्यक्त करू शकत नाही. हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि आपण अशा अमानवी वर्तनाच्या विरोधात भूमिका घेणे आवश्यक आहे.”

प्राण्यांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सरकारने कठोर कायदे केले पाहिजेत. देशाच्या विविध भागांतून प्राण्यांबरोबर होणाऱ्या अनेक भयंकर घटना समोर आल्या आहेत. या प्राण्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने कठोर कारवाई करून नियमांमध्ये सुधारणा करावी, असे त्यांनी केलेल्या मागणीवजा निवेदनात म्हटले आहे.