Mumbai Viral Video Fact Check : ‘लाईटहाऊस जर्नलिझम’ला एक व्हिडीओ मिळाला, जो विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत होता. एक मिनिटाच्या या क्लिपमध्ये एका गजबजलेल्या रस्त्यावर अचानक एक मोठा खड्डा (सिंक होल) दिसतो आहे, ज्यामुळे पाहणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा दावा करण्यात आला होता की, ही घटना मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी)जवळ घडली असून, युजर्सनी हा व्हिडीओ नुकत्याच घडलेल्या घटनेचा असल्याचे सांगितले होते.

पण, तपास केल्यानंतर ‘लाईटहाऊस जर्नलिझम’ला आढळले की, हा व्हिडीओ ना भारतातील, ना मुंबईचा; तर प्रत्यक्षात बँकॉक शहरातील जुनी घटना आहे.

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर @shivalicglgale याने दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल व्हिडीओ शेअर केला होता. तसेच ‘मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सजवळ रस्ता कोसळला’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

इतर युजर्सदेखील त्याच दाव्यासह हा व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास…

आम्ही व्हिडीओमधून मिळवलेल्या काही प्रमुख फ्रेम्सवर घेऊन, त्यांचा ‘रिव्हर्स इमेज सर्च’ केला. या शोधातून आम्हाला ‘यूएसए टुडे’ने अपलोड केलेला एक व्हिडीओ सापडला. हा व्हिडीओ सप्टेंबरमध्ये अपलोड करण्यात आला होता आणि कॅप्शनमध्ये म्हटले होते, ‘बँकॉकमध्ये नवीन भूमिगत रेल्वेलाइनच्या बांधकामाजवळ जमिनीत मोठा खड्डा तयार झाला’.

https://www.youtube.com/shorts/MRx2HIH8sWk

आम्हाला ‘अल जझीरा’च्या यूट्यूब चॅनेलवरही एक व्हिडीओ मिळाला.

आम्हाला ‘द स्टार’वर याबद्दलचा एक व्हिडीओ रिपोर्टही सापडला.

आम्हाला याबद्दलच्या बातम्याही मिळाल्या.

https://www.reuters.com/world/asia-pacific/thailand-works-tackle-massive-sinkhole-capital-2025-09-24

आम्हाला व्हायरल व्हिडीओच्या प्रमुख फ्रेम्स ‘दी इंडियन एक्सप्रेस’च्या एका बातमीमध्ये सापडल्या.

https://indianexpress.com/article/trending/trending-globally/bangkok-road-collapse-into-massive-sinkhole-swallow-cars-electric-pole-viral-video-10270463

त्या बातमीत म्हटले होते : सिनेमाच्या आपत्कालीन सीनमध्ये कॉम्प्युटरने बनवतात तसे ‘सीजीआय-हेवी’ (CGI-heavy) दृश्य खर्या आयुष्यात २४ सप्टेंबरला बँकॉकमध्ये घडले. रुग्णालयाजवळचा रस्ता अचानक कोसळला, मोठा खड्डा तयार झाला. त्यात कार, विजेचे खांब पडले आणि पाण्याचे पाइप्स अडकले.

निष्कर्ष : बँकॉक येथील रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्याचा व्हिडीओ मुंबईतील आहे, असे सांगून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.