Mayawati Recent Rally Viral Video : बहुजन समाज पक्षाच्या (BSP) प्रमुख मायावती यांनी गुरुवारी लखनऊ येथे BSP चे संस्थापक कांशीराम यांच्या पुण्यतिथीनिमित्त एका भव्य सभेचे (रॅलीचे) आयोजन केले होते. त्यादरम्यान लाईटहाऊस जर्नलिझमला (Lighthouse Journlism) एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे आढळले. या व्हिडीओमध्ये दिसणारी प्रचंड गर्दी मायावतींनी आयोजित केलेल्या नुकत्याच झालेल्या रॅलीची आहे, असा दावा केला जात होता. पण, तपासणीदरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ अर्जेंटिनातील आहे; जो लखनऊमध्ये झालेल्या बसपाच्या रॅलीचा असल्याचे सांगून शेअर केला जात आहे.

काय होत आहे व्हायरल?

अरुण चौधरी याने हा व्हिडीओ @arun_choudhary32 त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.

इतर युजर्सदेखील अशाच दाव्यांसह हा व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास –

आम्ही व्हिडीओतील मुख्य फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपासणी सुरू केली.

आम्हाला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये आढळला.

त्या पोस्टमध्ये म्हटले होते… “अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघाला पाहण्यासाठी सुमारे चार दशलक्ष (४० लाख) लोक एकत्र जमले होते. एवढी गर्दी होती की, मेस्सी आणि त्याच्या सहकाऱ्यांना सुरक्षितपणे हलवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करावा लागला”.

आम्हाला २० डिसेंबर २०२२ रोजी पोस्ट केलेला एक यूट्यूब शॉर्ट व्हिडीओदेखील आढळला…

कॅप्शनमध्ये म्हटले होते, “अर्जेंटिनाच्या रस्त्यावर ४० लाख लोक”

आम्हाला फेसबुकवर पोस्ट केलेला व्हिडीओदेखील आढळला.

https://www.facebook.com/reel/501896638908498

एका स्क्रीनशॉटमध्ये ‘HOSTEL SOL’ असा फलक असलेली इमारत दिसत होती. चित्रातील त्या फ्रेमवर आम्ही रिव्हर्स इमेज सर्च केले. मग आम्हाला एका वेबसाइटवर या हॉटेलबद्दलची माहिती मिळाली.

https://www.hostelsclub.com/en/hostel/hostel-sol

आम्हाला आढळले की, ही इमारत ब्यूनोस आयर्स (अर्जेंटिना) येथे स्थित आहे.

आम्हाला इमारतीचे ठिकाणदेखील आढळले. त्या ठिकाणचे स्ट्रीट व्ह्यू (Street View) व्हिडीओमध्ये दाखवलेल्या दृश्यासारखेच दिसत होते.

https://www.hostelsclub.com/en/hostel/hostel-sol

जरी हा व्हिडीओ मायावतींच्या नुकत्याच झालेल्या रॅलीचा नसला तरी त्यांच्या रॅलीला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. एएनआयच्या (ANI) YouTube चॅनेलवरील व्हिडीओत हीमायावतींच्या रॅलीतील गर्दी दाखविण्यात आली आहे.

निष्कर्ष – अर्जेंटिनाचा व्हिडीओ बसपाच्या नुकत्याच झालेल्या रॅलीचा असल्याचे सांगून शेअर केला जात आहे. पण, आमच्या तपासानुसार व्हायरल झालेला हा दावा दिशाभूल करणारा आहे.