सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. आई – वडीलांच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड कोणताचं मुलगा किंवा मुलगी कोणत्याही जन्मी करू शकत नाही. आई वडिल आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात, प्रसंगी स्वत: उपाशी राहतात मात्र मुलांना काही कमी पडू देत नाहीत. मुलांना चांगलं शिक्षण देऊन स्वप्न पाहतात. लेक ही वडिलांच्या काळजाचा तुकडा असते, लहानपणापासून वडिल लेकीला अगदी फुलाप्रमाणे जपतात. मात्र हीच मुलगी जर मोठी झाल्यावर वडिलांच्या विरोधात जात असेल तर, कोणत्याही वडिलांवर दुख:चा डोंगर कोसळेल. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

बाप-लेकीचं नातं काही स्पेशल असंत. कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तिच्या वडिलांवर.बोट धरून चालायला शिकवणारा बाबा असतो, लेकीच्या हट्टासाठी घोडा होणाराही बाबा असतो.लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळतो आणि प्रसंगी बाबाचा धाकही असतोच. म्हणूनच म्हणतात ना, बाप-लेकीच्या नात्याला कसलीच तोड नाही. मुलीची जागा कोणताही मुलगा घेऊ शकत नाही. मुली नेहमीच आई-वडिलांची सेवा करताना दिसतात. मात्र दुसरीकडे एक भयानक वास्तवही नाकारुन चालणार नाही ते म्हणजे क्षणिक प्रेमासाठी वडिलांचा विचार न करता अनेक मुली निघून जातात. अशावेळी काय होतं असेल त्या आई-वडिलांचं?

वडिल आणि लेकीचं नातं हे खूप वेगळं असतं. एक मुलगी जेवढं आपल्या वडिलांवर प्रे करते तेवढं प्रेम कुणीही करु शकत नाही. मात्र समोर आलेल्या व्हिडीओमध्ये उलटं झालं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वडील आपल्या मुलीसमोर हात जोडून उभे आहेत आणि ती तिच्या प्रियकरासोबत उभी, वडील तिला घरी चलण्याची विनवणी करतात. मात्र मुलगी त्यांना ओळखत नसल्याचं सांगते. जेव्हा मुलगी ऐकत नाही तेव्हा हा बाप आपल्या मुलीच्या पाया पडतो. पण, त्या निष्ठुर मुलीच्या काळजाला पाझर फुटत नाही. आपल्या मुलीला जाताना पाहून वडिलांचे डोळे भरून आले. लेकीसमोर हताश झालेल्या वडिलांना पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ pushp1902 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.