Mumbai local viral video: मुंबई लोकल म्हणजे मुंबईकरांचं दुसरं घरच जणू..याच मुंबई लोकलमध्ये लोकांचा अधिक वेळ जातो. घरी कमी आणि लोकलमध्ये जास्त अलं बऱ्याच जणांचं असतं. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात. मात्र आता याच लोकलमधून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रवास केलाय. यांचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याचा व्हिडीओ एक्स अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी एक अनोखा पुढाकार घेतला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बदलापूर एसी लोकलमधून शनिवारी प्रवास केला. घाटकोपर ते कल्याणदरम्यान प्रवासात त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी दुपारी १२.४२ वाजता घाटकोपर ते कल्याण वातानुकूलित लोकल ट्रेनमधून प्रवास केला. परतीच्या प्रवासासाठी त्यांनी कल्याण येथून सायंकाळी ५.३९ वाजता सुटणारी जलद नॉन-एसी लोकल पकडली. यावेळी सीतारामन यांनी प्रवासादरम्यान प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशीदेखील चर्चा केली.
देवेंद्र फडणवीसांनी शेअर केला VIDEO
याचा व्हिडीओ देवेंद्र फडणवीसांनीही शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत देवेंद्प फडणवीसांनी म्हणूनच देशात तिसरी बार मोदी सरकार पाहिजे. मा. केंद्रीय मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मुंबई लोकलमध्ये प्रवास करून सर्वसामान्यांशी संवाद साधला. असं कॅप्शनमध्ये म्हंटलंय.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> मुंबई: भाईंदरमध्ये रेल्वे येताच फूटओव्हर ब्रिजवरुन रुळावर मारली उडी अन्..; थराराक VIDEO व्हायरल
त्यांनी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधला. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये तो प्रवाशांच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सीतारामन यांना लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांनी घेरलेले दिसत आहे. त्या हसत हसत त्याच्याशी बोलत आहे. प्रवासी त्यांच्याशी बोलताना दिसतात. सीतारामन यांनी त्यांच्या प्रश्नांना संयमाने उत्तरे दिली आणि सरकारकडून काय पावले उचलली जात आहेत हे स्पष्ट केले. प्रवाशांच्या समस्या आपण समजून घेत असून त्या सोडविण्याचे काम केले जाईल, असेही त्या म्हणाल्या