Mumbai Local Train Viral Video : स्वप्नांची नगरी म्हटली जाणारी मुंबई प्रत्येक गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. उद्योगपतींपासून ते बॉलीवूड कलाकारांपर्यंत, मजुरांपासून ते राजकारण्यांपर्यंत प्रत्येकाला मुंबई हवी-हवी वाटते. मात्र, मुंबईत जगण्यासाठी प्रत्येक जण रोज कामासाठी धावपळ करताना दिसतो. या धावपळीत सर्वसामान्यांचा आधार असते ती म्हणजे मुंबई लोकल. रोज लाखो लोक मुंबई लोकलने प्रवास करतात. यात मुंबई पाहण्यासाठी म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. या परदेशी लोकांनाही मुंबई लोकलने प्रवास करण्याचा मोह आवरत नाही. अशाचप्रकारे एक ॲडम नावाचा सोशल मीडिया इन्फ्लूएंसर मुंबई फिरण्यासाठी म्हणून आला, यावेळी त्याने चर्चगेट स्थानकावरील त्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात तो त्याचा मोबाइल चोरी झाल्याचे सांगतोय. पण, व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवण्याऐवजी उलट त्यालाच चांगले फटकारले आहे. एका युजरने तर त्याला त्याच्या देशात परत जा, असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.

सहाजिकच आता तु्म्हाला प्रश्न पडला असेल की, या इन्फ्लूएंसरने असे काय केले की लोक त्यावर संताप व्यक्त करतायत? पण थांबा, कोणतेही तर्क मांडण्याआधी नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

two wheeler accident
पुणे: फटाक्यांच्या धूरामुळे गंभीर अपघात, दोन दुचाकींची समोरासमोर धडक; अपघातात चौघे जण जखमी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
hindu temple attacked in canada (1)
Video: “कॅनडात हिंदूंवर झालेला हा हल्ला म्हणजे…”, अमेरिकन संसदेतील मराठमोळे सदस्य श्री ठाणेदार यांचं परखड भाष्य!
vehicle dragging police
संतापजनक! दोन वाहतूक पोलिसांना कारच्या बोनेटवरून फरफटत नेलं; दिल्लीतील घटना
jahnavi killekar wash mother in law feet and perform pooja
Video : दिवाळीच्या दिवशी जान्हवी किल्लेकरने सासूबाईंसाठी केलं असं काही…; नेटकरी म्हणाले, “खरी लक्ष्मी तुच आहेस…”
CM Eknath Shinde on Arvind Sawant Statement about Shaina NC
CM Eknath Shinde : अरविंद सावंत यांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकारणापायी…”
navi Mumbai car hit six people
नवी मुंबई: मित्राच्या स्कुटीला धडक मारल्याचा राग आल्याने सरळ पाच – सहा जणांच्या अंगावर घातली गाडी
young man killed due to dispute over bursting firecrackers
फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून ॲन्टॉप हिल येथे तरूणाची हत्या

आता तर हद्द झाली! गर्दीने भरलेल्या मुंबई लोकलमध्ये कपलचा रोमान्स; एकमेकांना चिकटून….; Video व्हायरल

चर्चगेट स्थानकावर इन्फ्लुएंसरबरोबर नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, सुरुवातीला ॲडम चर्चगेट स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर उभा राहून चालत्या ट्रेनचा व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. यावेळी तो क्षण एन्जॉय करत असतानाच चालत्या ट्रेनमधून कोणीतरी त्याचा मोबाइल हिसकावला. या व्हिडीओमध्ये त्याचा मोबाइल हिसकावणाऱ्या व्यक्तीचा चेहराही कैद झाला आहे. या घटनेचा संदर्भ देत त्याने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, मुंबईतील चर्चगेट स्थानकावर कोणीतरी माझा फोन चोरला.

इन्फ्लुएंसरच्या व्हिडीओवर भडकले लोक

पण, या घटनेविषयी इन्फ्लूएंसरने जे काही सांगितले ते जाणून आता लोकांनी संताप व्यक्त केला आहे. यात ॲडम म्हणाला की, मोबाइल चोरीला गेल्यावर मी मदतीसाठी आरडाओरडा केला का? मी पोलिसांना फोन केला का? नाही, कारण तो चोर दुसरा कोणी नसून त्याचा मित्र ॲलन होता. मग काय; अशाप्रकारे विनाकारण मुंबई लोकलमधून मोबाइल चोरीला गेल्याचा बहाणा करत व्हिडीओ बनवणाऱ्या या इन्फ्लूएंसरवर लोक चांगलेच भडकले आहेत. अनेकांनी तर रागाच्या भरात कमेंट्समध्ये त्याला शिवीगाळ केली आहे.

“मुंबईची विनाकारण बदनामी करणे थांबवा” युजरची प्रतिक्रिया

या व्हिडीओवर एका युजरने कमेंट केली की, मी अनेकवेळा मुंबईत आलो आहे. मला अशा गोष्टींचा सामना कधीच करावा लागला नाही. लक्ष वेधण्यासाठी मुंबईची विनाकारण बदनामी करणे थांबवा. यावर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, पण मुर्खपणे ट्रेनचं चित्रीकरण करायचं कारण काय? आणखी एका युजरने कमेंट केली की, भाऊ दुसरी पद्धत वापर. केवळ लक्ष वेधण्यासाठी अशा युक्त्या वापरू नको.

या व्हिडीओवर एका युजरने कमेंट केली की, मी अनेकवेळा मुंबईत आलो आहे. मला अशा गोष्टींचा सामना कधीच करावा लागला नाही. लक्ष वेधण्यासाठी मुंबईची विनाकारण बदनामी करणे थांबवा. यावर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, मूर्खपणे ट्रेनचं चित्रीकरण करायचं कारण काय? आणखी एका युजरने कमेंट केली की, भाऊ दुसरी पद्धत वापर, केवळ लक्ष वेधण्यासाठी अशा युक्त्या वापरू नका.

मात्र, ॲडमची ही स्क्रिप्टेड रील काही लोकांना आवडली देखील आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, इथे आल्यानंतर परदेशी लोकही चोर झाले. तर इतर काहींनी म्हटले की, चोर इतका प्रामाणिक होता की त्याचा व्हिडीओही त्याने पोस्ट केला आहे.