Funny Driving License Test Video Goes Viral: भारतात किंवा इतर कोणत्याही देशात वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. १८ वर्षांचे झाले की अनेक तरुण-तरुणी महत्त्वाचे कागदपत्र तयार करण्याच्या तयारीला लागतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दस्तावेज म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स. कारण त्याविना कोणतंही वाहन चालवणं कायदेशीर दृष्टिकोनातून बेकायदा ठरतं. कार, बाईक, बस, कुठलंच वाहन चालवायचं असेल तरी लायसन्स अनिवार्य असतं आणि हे लायसन्स मिळवण्यासाठी दिली जाते एक टेस्ट. सध्या अशाच एका लायसन्स टेस्टमध्ये भाग घेतलेल्या मुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरलं नाही. नेमकं काय घडलं जाणून घेऊया…
ड्रायव्हिंग लायसन्स मिळविणे ही फार अवघड गोष्ट आहे, त्यामुळे टेस्टमध्ये जवळपास निम्म्याहून अधिक लोक नापास होतात, कारण या टेस्टमध्ये तुम्हाला गाडी चालवताना तुमचे ड्रायव्हिंग स्किल दाखवायचे असते. दरम्यान, सोशल मीडियावर सध्या अशाच एका ड्रायव्हिंग टेस्टदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं त्या व्हिडीओमध्ये?
व्हिडीओमध्ये दिसतं की एक तरुणी ड्रायव्हिंग टेस्टसाठी स्कुटीवरून रस्त्यावर उतरते. फील्डवर ठिकठिकाणी हर्डल्स ठेवण्यात आलेले असतात. ड्रायव्हिंग टेस्टमध्ये त्या मुलीला हर्डल्समधून व्यवस्थित गाडी पार करायची असते. नेमक्या अंतरावर लावलेले हे अडथळे पार करून तिला स्कुटी चालवत पुढे जायचं असतं. अगदी जसं टेस्टमध्ये अपेक्षित असतं. पण सुरुवातीचे एक-दोन अडथळे ती आत्मविश्वासाने पार करते, पण नंतर अचानक एक वळण घेताना तिचा बॅलेन्स बिघडतो आणि ती स्कुटीसह थेट खाली पडते. हा क्षण इतका अचानक आणि अनपेक्षित असतो की पाहणाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसतो. काही सेकंदात ती जमिनीवर आणि स्कूटी बाजूला पडते. ड्रायव्हिंग टेस्ट म्हणजे फक्त गाडी चालवण्याचा प्रश्न नाही, तर संयम, बॅलेन्स आणि आत्मविश्वासाचाही कस असतो. पण या व्हिडीओमध्ये तरुणीचा बॅलेन्स बिघडल्याचे दिसून येते.
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ X (पूर्वीचं Twitter) वरील @Guruji नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “ताईचा लायसन्स कन्फर्म!” या व्हिडीओला अल्पावधीतच तीन हजारांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. या व्हिडीओवर युजर्स विविध प्रकारे कमेंट करून आपआपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आता हा व्हिडीओ कुठून आणि केव्हाचा आहे याची माहिती देण्यात आलेली नाही, परंतु मुलीच्या या मजेशीर कृतीमुळे व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.