Funny Viral Video : विमानातील प्रवाशांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्याशिवाय विमानात अनेकदा अशा काही घटना घडतात की, ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे गोंधळाचे वातावरण निर्माण होते. पण, सध्या सोशल मीडियावर विमानातील असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे की, जो पाहून तुम्हाला हसू आवरणे अवघड होईल. या मजेशीर व्हिडीओत एक जण विमानाच्या दरवाजात उभा राहून चक्क तंबाखू मळताना दिसला. यापूर्वी आपण अनेक जण बस, ट्रेन किंवा रिक्षामध्ये बसून तंबाखू मळून खात असल्याचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील; पण आता एक जण थेट विमानातच तंबाखू मळताना पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओत काकांनी विमानाला एकदम रिक्षाच करून टाकलीय. ते चक्क विमानाच्या गेटवर उभे राहून अगदी आरामात तंबाखू मळत उभे आहेत.

काकांचा भलताच स्वॅग! विमानाच्या दरवाजावर उभं राहून मळली तंबाखू

विमानाने प्रवास करताना अनेक जण चांगले पॉश कपडे घालून विमानतळावर पोहोचतात. तिथे पोहोचल्यानंतर असे कोणतेही काम करणे टाळतात की, ज्यामुळे लोकांचे लक्ष आपल्याकडे जाईल किंवा आपण लोकांच्या नजरेत येऊ. प्रत्येक जण आपलं स्टॅण्डर्ड जपण्याचा प्रयत्न करीत असतो. पण, या व्हायरल व्हिडीओत एक काका विमानाच्या गेटवर उभे राहून तंबाखू मळून खात आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आपल्या हसण्यावर नियंत्रण ठेवणे अवघड जात आहे.

Read More Trending News : चोराला रंगेहाथ पकडले अन् मारहाण करीत लोकांसमोर लावले नाचायला; व्हायरल Video नेमका कुठला? वाचा सविस्तर…

तंबाखू मळली आणि चिमटीत घेऊन टाकली तोंडात

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, धावपट्टीवर एक खाजगी जेट उभे आहे आणि त्याभोवती क्रू मेंबर्स उभे असल्याचे दिसत आहे. याचदरम्या विमानाच्या मागील गेटवर एक वृद्ध व्यक्ती हातावर तंबाखू घेऊन, ती मळताना दिसत आहे. तो अगदी पद्धतशीरपणे तंबाखू मळतो आणि चिमटीत घेऊन, ती तोंडात टाकतो. हा मजेशीर व्हिडीओ नेमका कुठला आहे याची माहिती समोर आलेली नाही; मात्र लोक तो खूप शेअर करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ X वरून @MehdiShadan नावाच्या अकाउंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून, युजर्सही त्यावर अनेक मजेशीर कमेंट्स करीत आहेत. त्यावर एका युजरने लिहिले आहे की, काका हवेतही बोलतील, बोलो जुबां केसरी… दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, काकांनी तर चांगल्या प्रायव्हेट जेटची चक्क रिक्षा करून टाकली. तिसऱ्या युजरने लिहिले की, काकांना आता विंडो सीट द्या. त्याशिवाय इतर अनेक युजर्स या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स करीत आहेत.