साप पाहिला की प्रत्येकजण घाबरतो. या जगात सापाच्या अशा अनेक प्रजाती आहेत, ज्याच्या दंशामुळे काही मिनिटांत प्राण जातात.या जगात असे अनेक लोक असतात ज्यांना खतरनाक कामे करण्यात मजा येते. अनेकदा डेरिंगच्या नादात लोक आपला जीव धोक्यात टाकतात. काही लोकांना यात यश मिळतं तर काही लोकांसोबत हे करत असताना दुर्घटना होते.काही लोकांना प्राण्यांसोबत खेळणं, मस्ती करण आवडतं. काही लोक प्राण्यांबाबत इतकेच क्रेझी असतात की, ते त्यांना नेहमी आपल्या सोबत ठेवतात. सापाचं नाव काढताच भल्याभल्यांना घाम फुटतो. अशात फणा काढलेल्या सापाला किस करणं म्हणजे दूरच. पण असा कारनामा एका तरुणीने केला आणि तो तिच्या चांगलाच अंगलट आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. सापाला किस करणं पडलं महागात या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका सापाने या तरुणीवर हल्ला केला आहे. यामध्ये या तरुणीची पूर्णपणे चूक असून अति शहानपणा तरुणीच्या चांगलाच अंगलट आला आहे. यावेळी दोन लोक हातात मोठा साप घेऊन उभे आहेत. समोरच्या व्यक्तीच्या हातात सापाचं तोंड आहे. इतक्यात एक मुलगी तिथे येते आणि सापाचं चुंबन घेण्यासाठी आपला चेहरा पुढे करते. तिला येताना पाहून साप अचानक मागे वळतो आणि मुलीच्या ओठांवरच हल्ला करतो. तो तिचा ओठ सोडतच नाही. साप हाताळणारेही तिला सोडवण्याचा प्रयत्न करतात मात्र साप एकायला तयार नाहीय. पाहा व्हिडीओ हेही वाचा - Building Stunt: बिल्डिंगच्या रेलिंगवर जीवघेणा स्टंट, छोटीशी चूक अन् उंचावरुन थेट कोसळला तरुण हा प्रकार पाहून अनेकांना भीती नक्कीच वाटली. हा व्हिडीओ पाहताना तुम्ही तुमचं श्वास रोखून पाहू लागाल.हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया युजर्सला चांगलाच धक्का बसला आहे. आता या मुलीनं असं का केलं याचं कारण तर समोर अलेलं नाही.