Girlfriend Boyfriend Video: अनेकदा कपलचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. याशिवाय, मुला-मुलींचे रील बनवणारे मजेशीर व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. अशाच एका कपलच्या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बाईकवरून फिरायला गेलेलं हे कपल आहे. यावेळी गर्लफ्रेंडने बॉयफ़्रेंडसोबत असं काही केलं की, अशी गर्लफ्रेंड नको रे बाबा, असंच बघणाऱ्यांना वाटेल. असं या व्हिडिओत नेमकं काय घडलं ते तुम्हीही एकदा पाहाच..

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक जोडपं बाईकवरून जाताना पाहायला मिळत आहे. मुलाच्या मागे बसलेली त्याची गर्लफ्रेंड रिल बनवण्यात व्यस्त आहे. ती वारंवार आपल्या बॉयफ़्रेंडला मोबाईलमध्ये बघून म्हणून बोलत आहे. तिचा बॉयफ़्रेंड पहिल्यांदा तर ऐकत नाही मात्र नंतर तो मोबाईल मध्ये बघतो आणि त्यानंतर जे घडतं ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

( हे ही वाचा: Video: लग्नात बेभान नाचत होती ‘ही’ महिला; उड्या मारत असा डान्स केला की पाहुणेही झाले फिदा)

येथे व्हिडिओ पहा

( हे ही वाचा: मगरीने पक्षी समजून ड्रोन कॅमेऱ्यावर केला भयानक हल्ला; पाण्यातून लांबलचक उडी मारतानाचा Video Viral)

बॉयफ़्रेंड मोबाईलमध्ये बघताच त्याचे लक्ष कॅमेऱ्याकडे असल्याने त्याची बाईक कुठेतरी धडकते आणि बाईकसह दोघेही खाली पडतात. पण यानंतर गर्लफ्रेंड उभी राहते आणि हातात मोबाईल घेऊन पुन्हा व्हिडिओ बनवू लागते. तिच्या मागे बाईक सोबत तिचा बॉयफ़्रेंड देखील पडलेला दिसतो. मात्र अपघातातून वाचलेल्या गर्लफ्रेंडने अशावेळी आपल्या बॉयफ़्रेंडकडे जाणं अपेक्षित होतं पण ती मात्र व्हिडीओ बनवत बसली. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर memecentral.backup नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘मृत्यू चालेल पण अशी गर्लफ्रेंड नको’ असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून लोक यावर वेगवेगळया प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलंय की, मी सिंगलच ठीक आहे. अशी कंमेंट केली आहे.