Google Doodle 2023 : नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेकांचे नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे अनोखे प्लॅन ठरले आहेत. हे नवीन वर्ष उत्साहात साजरे करण्यासाठी अनेक जण फिरायला जाणे, हॉटेलमध्ये खायला जाणे किंवा घरीच पार्टी करणेसुद्धा पसंत करतात. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत करतात. तर गुगलनेदेखील वर्षाअखेरीस त्याचे खास डूडल सादर करून नवीन वर्षासाठी काउंटडाऊन सुरू केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्हीदेखील तुमच्या स्क्रीनवर गुगल ॲप चालू केल्यास आज तुम्हाला गुगलचे रूप बदललेले दिसेल. गुगलने आपले डूडल बदलून २०२३ ला निरोप देतो आहे आणि नवीन वर्ष २०२४ साठी उत्सुक आहे, या खास डूडलचे नाव “न्यू इयर एव्ही २०२३” असे ठेवण्यात आले आहे. तसेच खाली सेलिब्रेशन या पर्यायावर क्लिक केल्यावर पिपाणीचा आवाज येत आईस्क्रीम कोनसारख्या चित्रातून रंगीबेरंगी कागद उडताना दिसत आहेत.

हेही वाचा…VIDEO: याला म्हणतात माणुसकी! भर रस्त्यात उलटला केळीने भरलेला ट्रक; ये-जा करणाऱ्यांनी अशी केली मदत…

२०२३ च्या शेवटच्या दिवशी गुगलने खास डूडल सादर केले आहे. जिथे गुगल लिहिलेलं आहे तिथे ओ (o) या अक्षराच्या जागी डिस्को बॉल चित्रित केला आहे. पूर्ण गुगल या शब्दाला रंगीबेरंगी रिबीनने सजावट केली आहे. या डिस्को बॉलमध्ये हसणाऱ्या चेहऱ्याचा इमोजी लावला आहे. तसेच जेव्हा डूडलच्या वरच्या बाजूला तुम्ही क्लिक करता, तेव्हा नवीन वर्षाची संध्याकाळ आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक छायाचित्रेही पाहायला मिळतात.

तसेच गुगलने एक खास मेसेज युजर्ससाठी लिहिला आहे की, “३..२..१.. नवीन वर्षाच्या शुभेच्या! हे डूडल नवीन वर्षाची एक योग्य सुरुवात करते. जशी जशी वेळ जवळ येत आहे, तसे तसे जगभरातील लोक नवीन वर्षाचे संकल्प आखत आहेत आणि इतरांना प्रेम, आनंदाने शुभेच्छा देत आहेत’; असा संदेश गुगलने दिला आहे. तसेच पुढे “रंगानुसार अधिक डूडल शोधा”, या पर्यायावर तुम्ही क्लिक केलात तर तुम्हाला २०२३ मधील त्या त्या रंगाचे डूडल दिसून येतील.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google celebrates new years eve with special animated doodle to celebrate the last day of 2023 asp
First published on: 31-12-2023 at 17:29 IST