लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला आनंदी दिवस असतो. या खास दिवसासाठी अनेकजण काही महिने अगोदरच तयारीला लागतात, जेणेकरून लग्नाच्या दिवशी कोणती गडबड होऊ नये. पण अनेकवेळा अस होत की कितीही तयारी केली, सर्व नियोजन व्यवस्थित केले तरी काहीतरी अडचण येतेच आणि व्हायचा तो गोंधळ होतोच किंवा कधीकधी अतिशय पैसा खर्च करून केलेले डेकोरेशन, जेवण यापेक्षा भलत्याच कोणत्यातरी गोष्टीमुळे ते लग्न लक्षात राहते. असाच काहीसा प्रकार सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये घडला आहे.

हा व्हिडीओ एका लग्नातील आहे. या कारणासाठी आपल्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल हवा असे या जोडप्याला अजिबात वाटले नसेल. या व्हिडीओमध्ये लग्नमंडपात विधी सुरू असल्याचे दिसत आहे. पण तेवढ्यात या नवरदेवाला नवरीचा चेहरा पाहण्याची इच्छा होते आणि तो तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करतो. तिचा चेहरा पाहताच तो अनपेक्षितपणे किंचाळतो. हे पाहून उपस्थितांना हसू अनावर होत. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

Viral Video : लडाखमधील मुलीच्या बॅटिंग स्किलची नेटकऱ्यांना पडली भुरळ! आवडता क्रिकेटर कोण विचारताच म्हणाली…

व्हायरल व्हिडीओ :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये नवरा किंचाळत का आहे याचे अनेक अंदाज नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये लावले आहेत. या नवरदेवाने नवरीला आणि उपस्थित असलेल्या सर्वांना हसवण्यासाठी अशी प्रतिक्रिया दिली असेल असे अनेक नेटकऱ्यांचे मत आहे.