आतापर्यंत परीक्षेत कॉपी करण्याच्या अनेक पद्धती समोर आल्या आहेत, पण कॉपी करताना करोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी असलेल्या मास्कचाही वापर केला जाईल, याची कल्पना क्वचितच कोणी केली असेल. पण फसवणूक करून परीक्षेला बसलेल्यांनी त्याचाही वापर सुरू केला आहे. महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवडमध्ये मास्कद्वारे कॉपी करण्याचे प्रकरण समोर आले आहे.

पोलीस कॉन्स्टेबल भरतीची होती परीक्षा

पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीत पोलीस हवालदार भरतीसाठी परीक्षा सुरू होती. या तपासणीदरम्यान एका व्यक्तीच्या मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरण बसवलेले आढळून आले. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणाले की, एक व्यक्ती कॉन्स्टेबल भरती परीक्षेला बसण्यासाठी आली होती, त्याची तपासणी केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणाने सज्ज असलेला मास्क जप्त करण्यात आला.

( हे ही वाचा: Video: “मॅन ऑफ द मॅच आम्हा पटेलांमध्येच राहील असे दिसते!” – हर्षल पटेल )

( हे ही वाचा: दुर्मिळ आजाराने त्रस्त असलेल्या मुलीला ‘या’ कंपनीने केली १६ कोटींची मदत )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी

पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने घातलेल्या मास्कमध्ये सिमकार्ड, माईक आणि बॅटरी आढळून आली. तपासादरम्यान मास्क जप्त करण्यात आला असला तरी आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर, पोलिसांनी मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवल्याबद्दल दोघांना अटक केली. त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.