जंगलाच्या जवळ राहणारे लोक नेहमीच तेथील प्राण्यांच्या दहशतीखाली वावरत असतात. प्राणी जंगलातून बाहेर शेतात, रस्त्यावर तर कधी अंगणातसुद्धा फेरफटका मारतात. जंगलाजवळ राहणाऱ्या माणसांचा प्राण्यांशी नेहमीच सामना होत असतो; पण अशा प्राण्यांचा सामना करण्याची जंगलाजवळ राहणाऱ्या माणसांना सवय झालेली असते. ही सवय त्यांच्या इतकी अंगवळणी पडलेली असते की, ते जंगली प्राणी कोणत्या कारणामुळे तुमच्यावर हल्ला करतील हेसुद्धा सहज सांगू शकतात. आज सोशल मीडियावरसुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. एका आयएफएस (IFS) अधिकाऱ्यानं एक पोस्ट शेअर केली आहे. जंगलातील हत्तीनं आयएफएस अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरचं (Driver) घर उद्ध्वस्त केलं; पण ड्रायव्हरनं त्याचा दोष हत्तीला न देता, त्यामध्ये स्वतःची चूक असल्याचं सांगितलं. ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

आयएफएस अधिकारी मुदित वर्मा प्रवासादरम्यान त्यांच्या ड्रायव्हरशी संवाद साधत होते. त्यादरम्यान ड्रायव्हरनं गेल्या वर्षी घडलेली एक घटना सांगितली. गेल्या वर्षी जंगलातील हत्तीनं ड्रायव्हरचं घर उद्ध्वस्त केलं होत; पण त्याचा दोष हत्तीला न देता, ड्रायव्हर म्हणतो की, ती घटना माझ्या चुकीमुळे घडली. पुढे ड्रायव्हर म्हणतो, “जर मी घरात केळीचा घड ठेवला असता, तर कदाचित हत्तीनं माझं घर उद्ध्वस्त केलं नसतं.” आयएफएस अधिकाऱ्यानं शेअर केलेली पोस्ट एकदा तुम्हीसुद्धा बघाच.

crime
pimpri crime: कोयता गँग सक्रिय? शुल्लक कारणावरून कोयत्याने वार
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
case against three in mumbai for kidnapping tailor
मुंबई: ‘डिझाइन’चोरल्याच्या संशयावरून मारहाण, एक लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप
Pet dog owner, Dombivli, Samrat Chowk,
डोंबिवलीत सम्राट चौकात पाळीव श्वान मालकाची वडील-मुलाला ठार मारण्याची धमकी
Crime News Varanasi
Crime News: ‘तू माझा नाही तर कुणाचाच नाही’, चिडलेल्या प्रेयसीचे धक्कादायक कृत्य; प्रियकराच्या पत्नीला…
rickshaw driver beaten, rickshaw Thakurli,
Dombivli : भोंगा वाजविल्याच्या रागातून ठाकुर्लीत रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड मारला
man suicide due to father-in-laws troubles Crime against six people
सासरच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या; सासू, सासऱ्यांसह सहाजणांविरुद्ध गुन्हा
pune Police commissioner
पुणे: पोलीस आयुक्तांकडून शस्त्र बाळगणाऱ्या सराइतांविरुद्ध कारवाईचे आदेश, पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला पकडले

हेही वाचा… Mumbai Vadapav : मुंबईचा चीज वडापाव खाल्ला का? व्हायरल व्हिडीओ पाहून तोंडाला पाणी सुटेल

पोस्ट नक्की बघा :

इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे अधिकारी (IFS) यांची पोस्ट :

आयएफएस अधिकारी मुदित वर्मा यांनी त्यांच्या अधिकृत गाडीमधला एक फोटो पोस्ट केला आहे. गाडीमध्ये पुढे गणवेशात एक ड्रायव्हर बसला आहे. त्याचं नाव कमल असं आहे. कमल या ड्रायव्हरचं घर गेल्या वर्षी हत्तीनं उद्ध्वस्त केलं. पण याचं दुःख त्यांना अजिबात नसून त्यांनी हत्तीसाठी घरात केळीचा घड ठेवला नाही या गोष्टीचं त्यांना सगळ्यात जास्त वाईट वाटत आहे. ही गोष्ट ऐकून आयएफएस अधिकाऱ्याला आश्चर्य वाटलं आणि त्यांनी ही गोष्ट सोशल मीडियावर सगळ्यांसोबत शेअर केली.

सोशल मीडियावर ही पोस्ट आयएफएस अधिकारी यांच्या अधिकृत @MuditKVarma एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमधून हे समजून येत आहे की, नेहमी हत्तीसाठी केळीचा घड घरात आवर्जून ठेवणारा ड्रायव्हर हत्तीसाठी त्या दिवशी केळी ठेवायला विसरला असेल म्हणून रागात येऊन हत्तीनं त्याचं घर उद्ध्वस्त केलं. जंगलातील प्राणी आणि माणसांचं नातं कसं असतं याचं एक उदाहरण या पोस्टमधून पाहायला मिळालं आहे.