How to break thumb sucking habit ए..तोंडातला अंगठा काढ बाहेर…लहान बाळ असलेल्या घरात हे वाक्य एकायला येतच. काही लहान बाळाला अंगठा चोखण्याची एक जन्मजात सवय असते. पुढे हीच सवय बनते. बऱ्याचदा लहान मुलांना शांत करण्यासाठी तोंडात निप्पल किंवा चोखणी देण्याची सवय लावली जाते. मात्र, काही काळानंतर हीच सवय पालकांसाठी डोकेदुखी ठरते. कारण पाच वर्षांपेक्षा जास्त काळ अंगठा चोखण्याची सवय कायम राहिल्यास त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.लहान मुलांमध्ये ही सवय सामान्य असल्याने आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र मुलांकडून जर ही सवय सुटली नाही तर परिणाम लहान मुलांवर दिसून येतात. मात्र एका स्मार्ट आईने तिच्या बाळाची हीच अंगठा चोखायची सवय क्षणात मोडली आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बाळ अंगठा चोखताना दिसत आहे. बाळ खूपच थकलेलं आणि निराश दिसत आहे. तो सारखे तोंडात बोट घालत आहे. यावेळी तिथे बाळाची आई येते आणि त्याचं बोट तोंडातून काढण्याचा प्रयत्न करते. मात्र बाळ ते पुन्हा तोंडात घालत असे. चिमुकल्याची आई त्याला रोखण्याचा प्रयत्न करते तरी तो काही ऐकत नाही. त्यानंतर त्याची आई एक कडू कारले घेऊन येते आणि त्याच्या बोटांना चोळते. त्यानंतर काय…चिमुकला पुन्हा तोंडात बोट घालतो पण त्याचे तोंड एकदम वाकडे होते. आईचा हा भन्नाट जुगाड सध्या सगळीकडेच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> आतापर्यंतची सगळ्यात भारी पुणेरी पाटी! वाचून तुम्हीही कराल कौतुक; VIDEO एकदा पाहाच

अनेकदा बाळांची तोंडात अंगठा घालण्याची सवय सोडविण्यासाठी आपण त्याच्या अंगठ्याला तिखट विचित्र पदार्थ लावतो. कृपया अशा कृती करणे तात्काळ थांबवाव्यात. असे वागणे अत्यंत चुकीचे आहे.
पालक म्हणून मुलांच्या अंगठा चोखण्याच्या सवयीबाबत आपणास काळजी वाटते. पण हे लक्षात असू द्या की, ज्या प्रमाणे अंगठा चोखायची सवय मुलांनी स्वतःच स्वतःची लावलेली असते. अगदी त्याचप्रमाणे मुले मोठी झाल्यावर या अंगठा चोखण्याच्या सवयीचा मुलांना विसर पडतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ pendidikanparentinganak नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. काहींनी आईच्या कृतीचं कौतुक केलं आहे तर काहींनी टीकाही केली आहे.