माणसांना असं नेहमी वाटतं की त्यांनाच फक्त भावना किंवा एकमेकांविषयी प्रेम आहे. प्राण्यांना फक्त एकमेकांशी भांडणे आणि शिकार करणे हेच माहित आहे. पण ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे, कारण प्राण्यांमध्येही आपुलकी, एकमेकांविषयी प्रेम आणि आपुलकीची भावना असते. सध्या सोशल मीडियावर कांगारूचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुम्हाला त्यांच्यामध्ये असलेले प्रेम देखील पाहायला मिळेल. IAS अधिकारी सुप्रिया साहू यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. जो प्रचंड व्हायरल होत आहे.

IAS अधिकारी सुप्रिया साहू ट्विटरवर खूप सक्रिय असतात आणि अनेकदा नवनवीन व्हिडिओ पोस्ट करत असतात. अलीकडेच, त्यांनी एका कांगारूचा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये कांगारू आपल्या मुलावर प्रेम करताना दिसत आहे. मादी कांगारूचा हा व्हिडिओ देखील खास आहे कारण ती माणसांप्रमाणेच आपल्या मुलाला मिठी मारताना दिसत आहे.

मादी कांगारू आपल्या पिल्लाला माणसाप्रमाणे मिठी मारते..

( हे ही वाचा: मुख्यमंत्री योगींनी मांडीवर मांजर बसल्याचा फोटो ट्वीट करताच नेटकरी म्हणाले, “आम्ही गुंड…”)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मादी कांगारू मुलाला मिठी मारतानाचा व्हिडिओ शेअर करताना सुप्रिया यांनी लिहिले की, हे सर्वात सुंदर दृश्य आहे. व्हिडिओमध्ये एक मादी कांगारू आपल्या पिल्लाला समोरच्या दोन्ही हातांनी धरून त्याला मिठी मारत आहे. ते पिल्लू देखील आपल्या आईला चाटताना दिसत आहे. आई देखील वारंवार आपल्या मुलाला मिठीत घेते आणि छातीशी धरते. हा व्हिडीओ शेली पिअरसन नावाच्या फोटोग्राफरने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून याला आतापर्यंत भरपूर व्ह्यूज मिळाले आहेत.