Dog Attacks Man Private Part: हरियाणातील कर्नाल जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे येथील एका ३० वर्षीय शेतकऱ्यावर पिटबुल जातीच्या कुत्र्याने हल्ला केला. या वेळी कुत्र्याच्या तावडीतून स्वत:चा बचाव करण्यासाठी या शेतकऱ्याने कुत्र्याच्या तोंडात कपडा घातला आणि आपला जीव वाचवला. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी करण नावाची व्यक्ती आपल्या शेतात गेली असताना कुत्र्याने त्याच्या प्रायव्हेट पार्टला चावा घेतला. कुत्र्याच्या हल्ल्यात करण गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी तत्काळ त्याला घरौंडा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना कर्नाल येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही पाहा- Video: ऐनवेळी मोबाईल स्टँड न मिळाल्याने कार चालकाचा अनोखा जुगाड, पायातील चप्पल काढलं अन्…

दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी हल्ला करणाऱ्या कुत्र्याला काठ्यांनी बेदम मारहाण केली ज्यात कुत्र्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी जखमी तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “करण त्याच्या शेतात होता, तर पिटबुल कुत्रा शेतातील एका मशीनखाली बसला होता. करण मशीन वापरण्यासाठी त्याच्याजवळ आला असता, कुत्र्याने करणच्या गुप्तांगाला चावा घेतला.”

हेही पाहा- किळसवाणा प्रकार! थुंकी लावून बनवायचा तंदूर रोटी, Video सोशल मीडियावर व्हायरल

पोलीसांकडून कुत्र्याच्या मालकाचा शोध –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जमिनीवर पडलेल्या कापडाच्या तुकड्याने पिटबुलचे तोंड बंद करून करणने कसा तरी जीव वाचवला, मात्र तोपर्यंत तो गंभीर जखमी झाला होता, असे सांगितले जात आहे. करणचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी तो जमिनीवर पडलेला आणि त्याच्या गुप्तांगातून रक्त येत असल्याचे पाहून त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी सांगितलं की, आम्ही कुत्र्याच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्यावर योग्य ती करु.