Pune viral video: ‘पुणे तिथे काय उणे’ असं पुण्याबाबत नेहमी म्हटलं जातं, याचा प्रत्यय आज आला. पुणे हे जगात प्रसिद्ध शहर आहे. पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. सोशल मीडियावर कधी काय फेमस होईल हे सांगता येत नाही. सोशल मिडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामधील असे काही व्हिडीओ असतात, की ते बघितल्यानंतर आपण हसू आवरू शकत नाहीत. तर कधी कधी पुणेकरांच्या आडमुठेपणाचा अनुभन येतो, सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे. पुणेकर, पुणेकारांच्या गोष्टी, त्यांनी केलेले अपमान, त्यांच्या भन्नाट करामती आणि त्यासोबतच त्यांनी केलेले कौतुकास्पद आणि धैर्यवान कार्य याचे किस्से आपण कायमच ऐकतो. पुणेकरांनाचं असल्या भन्नाट कल्पना सुचू शकतात, असंही अनेकजण म्हणतात. मात्र हे तितकंच खरं देखील आहे. पुणेकरांच्या अनेक करामतींची राज्यभर चर्चा होते. अशाच एका करामतीचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल ऐवढा अॅडिट्युड येतो तरी कठून…व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

पुणे एक लोकप्रिय शहर आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील अनेक तरुण मंडळी नोकरी आणि शिक्षणासाठी पुण्यात येतात त्यामुळे पुणे हे नेहमी चर्चेत येतं. पुण्यातील कोणताही विषय, घटना लवकर व्हायरल होते.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पुण्यात भर रस्त्यात बसपुढे एक व्यक्ती बसलेला दिसत आहे. या व्यक्तीला सगळे बाजुला करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र हा बसच्या समोरुन बाजूला व्हायचं नाव घेत नाहीये. सगळ्यांना प्रश्न पडलाय की नक्की झालंय तर काय असा बससमोर हा व्यक्ती का बसला आहे? बसची वाट का अडवत आहे? तर त्याचं झालं असं की, या व्यक्तीनं बसमधून प्रवास करताना एकदा तिकिट काढूनही त्याला पुन्हा तिकीट काढायला सांगितलं म्हणून या व्यक्तीनं रागात बससमोर बसचा रस्ता अडवला आहे. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून हे फक्त पुणेकरच करु शकतात अशा प्रतिक्रिया आता येत आहेत.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Nilesh Khilare (@nilesh.khilare)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ nilesh.khilare नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. एकानं प्रतिक्रिया देत म्हंटलंय, “पुणेकर हू झुकेगा नही साला” तर आणखी एकानं “५ रुपयांचा प्रश्न नाहीये साहेब prestige चा प्रश्न आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.