Viral Video : दररोज रेल्वेतून प्रवास करण्यासाठी आपण तिकीट काढतो. पण, गावी किंवा फिरायला जाणाऱ्या रेल्वेचे तिकीट काही महिन्यांपूर्वीच बुक करावे लागते; जेणेकरून आपला प्रवास सोईस्कर होईल. पण, अशातच काही जणांची बुक करण्यात आलेली तिकिटे कन्फर्म होत नाहीत आणि त्यांना मिळेल तिथे जागा पकडून प्रवास करावा लागतो. तिकीट कन्फर्म झालेले प्रवासी आपापल्या सीटवर अगदी आरामात बसून घेतात आणि उरलेल्या प्रवाशांना रेल्वेत बसण्यासाठी जागा नसल्यामुळे अनेकजण जमिनीवर त्यांच्या सामानावर डोकं ठेवून, तर काही जण रेल्वेत सीटच्या मध्यभागी जागा मिळेल तिथे झोपतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात प्रवाशाने चादर बांधून झोपाळा तयार केला आहे आणि त्यात झोपला आहे.
व्हायरल व्हिडीओ रेल्वेचा आहे. रेल्वेत प्रवाशांची एकच गर्दी दिसत आहे. गर्दीने भरलेल्या ट्रेनमध्ये अनेक प्रवासी जिथे जागा मिळेल तिथे झोपले आहेत. अशातच एका तरुणाने झोपण्यासाठी अनोखा जुगाड केला आहे. तरुणाने दोन सीटच्या अगदी मधोमध एक चादर बांधून झोपळा तयार केला आहे. तरुणाने चादरीला अगदी झोपाळ्यासारखे बांधून घेतले आहे आणि त्यात निवांत झोपलेला दिसत आहे. तरुणाचा झोपाळ्यावरून तोल जाईल अशी कोणतीही भीती त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत नाही आहे आणि तो बिनधास्त चादरीच्या झोपाळ्यावर झोपला आहे. ट्रेनमध्ये निवांत झोपण्यासाठी तरुणाने केलेला जुगाड तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…
हेही वाचा… गौराई आली सोन्याच्या पावली! भाजी विकणाऱ्या जुळ्या बहिणींना बनवले सुंदर गौरी; पाहा Viral Video
व्हिडीओ नक्की बघा :
चादर बांधून केली झोपण्याची सोय :
गावांमध्ये अशाप्रकारचा झोपाळा लहान मुलांसाठी बांधण्यात येतो. लहान मुलांना झोपवण्यासाठी किंवा त्यांना खेळवण्यासाठी असे चादरीचे झोपाळे तयार करण्यात येतात. तर आज या व्हिडीओत तरुणानेसुद्धा असंच काहीसं केलं आहे. गर्दीने भरलेल्या ट्रेनमध्ये आरामात झोपण्यासाठी तरुणाने चादरीचा उपयोग केला आहे. तरुणाने ट्रेनमधील दोन सीटच्या अगदी मधोमध चादर बांधून घेतली आहे आणि त्यावर निवांत झोपला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @hathimismayil या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘त्याला ट्रेनपेक्षा जास्त त्याच्या बेडशीटवर विश्वास आहे’ असे एक युजर म्हणत आहे. तसेच अनेकजण मजेशीर प्रतिक्रिया देताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. प्रवाशाने चादर बांधून झोपण्याची उत्तम सोय केली आहे, असे म्हणायला हरकत नाही.