Viral Video of Woman took thier children directly in the ATM to sleep : सध्या कधी ऊन कधी पाऊस असे वातावरण झाले आहे. कधी उन्हामुळे किंवा ढगाळ वातावरणामुळे प्रचंड उकाडा जाणवतो. अशा परिस्थितीत उकाड्याने लोक इतके हैराण झाले आहेत की आता ते आराम मिळवण्यासाठी काहीही करण्यास तयार आहेत. उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक एका पेक्षा जास्त एक जुगाड करताना दिसतात. कधी हटके पद्धतीने पंखा बनवतात तर कधी पंख्यातून एसीसारखा थंडावा मिळेल असा जुगाड करतात. उकाड्याने हैराण झालेल्या काही महिलांचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. उकाड्यापासून वाचण्यासाठी काकूंनी जे शक्कल लढवली आहे ते पाहून नेटकरी चक्रावले आहे. व्हिडिओ पहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल – “भाऊ, यांनी तर हद्दच केली राव!

भारतात कधी काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. भारतातील लोकांकडे प्रत्येक समस्येवर काही ना काही जुगाड हा असतो. या जुगाडसाठी अनेकदा लोक चर्चेतही येतात. अशाच एका जुगाडची चर्चा होत आहे. उष्णता आणि उकाड्याने हैराण झालेल्या दोन महिलांनी जो जुगाड केला आहे ते पाहून नेटकरी चक्रावले आहे. उकड्याने वैतागलेल्या मुलांना घेऊन या दोन्ही महिला थेट एटीएम मध्ये पोहचल्या आहेत. होय तुम्ही योग तेच ऐकत आहात. बँकाद्वारे विविध ठिकाणी एटीएम मशीन बसवलेल्या असतात जिथे एसीची सोय असते. याच एसीचा आनंद घेण्यासाठी या महिलांनी हा जुगाड केला आहे.

या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, “कडक उन्हाने त्रस्त असलेल्या दोन महिला आणि त्यांच्याबरोबर असलेली दोन लहान मुले चक्क एटीएममध्ये आराम करत आहेत. मुले एसीच्या थंड हवेत आरामात झोपलेली दिसत आहे तर काकू आरामात बसलेल्या दिसत आहेत. व्हिडिओ पाहून असा अंदाज लावता येतो की,”त्या काही वेळ थंड हवेचा आनंद घेण्यासाठीच तिथे पोहोचल्या आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ @studentgyaan या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये वर लिहिले आहे – “खूपच उकाडा आहे भाऊ!” आणि कॅप्शनमध्ये गंमतीने लिहिले आहे – “उकाड्यावर उपाय.” या व्हिडिओला सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून प्रचंड प्रतिक्रिया मिळत आहेत. कोणीतरी लिहिले, “एटीएम आता ऑटोमेटेड थंडा मशीन बनले आहे,” तर कोणीतरी गमतीने म्हटले, उकड्यापासून सुटका मिळवण्याच्या योजनेत नवीन जुगाड.