Indian Railway Viral Video : ट्रेनमधील प्रवासादरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी ट्रेनमधील रील्सचे, कधी भांडणाचे, तर बसण्यासाठी केलेल्या जुगाडचे व्हिडीओ व्हायरल केले जातात. याशिवाय ट्रेनमधील अपघाताचे व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. पण, सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर ट्रेनमध्ये कोणाला मदत करायची की नाही असा प्रश्न पडेल. कारण या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती माणुसकी म्हणून एका व्यक्तीला ट्रेनमध्ये चढायला देतो, पण त्याच्याबरोबर नेमके काय घडते तुम्ही व्हिडीओमध्ये पाहा.

ट्रेनमधून प्रवास करताना आपण अनेकदा माणुसकी म्हणून कोणाला बॅग ठेवण्यासाठी तर कधी प्लॅटफॉर्मवर सामान उतरवून देण्यासाठी मदत करतो. पण, हीच मदत करणे एका व्यक्तीच्या अंगलट आली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रेन प्लॅटफॉर्म सोडत संथ गतीने धावत आहे. याचवेळी हातात दोन मोठ्या पिशव्या घेऊन एक व्यक्ती ट्रेन पकडण्यासाठी जीव तोडून धावत असते. त्याची ट्रेन चुकू नये म्हणून एक व्यक्ती स्वत: ट्रेनमधून खाली उतरते आणि त्याला चढण्यासाठी मदत करते. यानंतर मदतीसाठी खाली उतरलेली व्यक्ती ट्रेनमध्ये चढण्यासाठी धावते, पण तो ट्रेनमध्ये चढण्याआधीच प्लॅटफॉर्म संपतो आणि त्याला ट्रेनमध्ये चढणे कठीण होते. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, हा व्हिडीओ आता खूप व्हायरल होत आहे.

दुसऱ्याला मदत करण्यासाठी चालत्या ट्रेनमधून उतरला खाली अन्…

व्हिडीओ X हँडलवर @HasnaZaruriHai नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना, ‘दुसऱ्यांची स्वप्नं पूर्ण करताना, स्वत:ची स्वप्न अपूर्ण राहिली’, असे कॅप्शन लिहिले आहे. आतापर्यंत हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

हेही वाचा – मुलं मोबाईलला हात लावताना १०० वेळा विचार करतील; वापरा फक्त शिक्षकांनी Video मध्ये दाखवलेली ‘ही’ ट्रिक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की, ‘अनेकदा असे घडते भाऊ, यात त्याची काय चूक नाही.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘तुम्ही इतके चांगले का करायला जाता?’ तिसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘अनेकदा असे अनेक लोकांबरोबर घडते, इतरांना मदत करताना ते स्वत: लाचार होतात.’ आणखी एका युजरने लिहिले आहे की, ‘सरकारला सांगावे लागेल की ट्रेन ३० मिनिटे थांबली पाहिजे.’