Indian Railway : भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सेवा- सुविधांसाठी अनेक बदल, नियम करत असते. असाच एक नवा बदल भारतीय रेल्वे १ एप्रिलपासून लागू करणार आहे. डिजिटल इंडियाच्या दिशेने पाऊल टाकणारी भारतीय रेल्वे १ एप्रिलपासून रेल्वे कॅटिंग(की कँटीन), तिकीट, दंड आणि पार्किंगपर्यंत सर्वत्र ऑनलाईन पेमेंट सुविधा सुरू करत आहे. विशेष म्हणजे आता रेल्वे विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून क्यूआर कोड स्कॅनिंगच्या मदतीने दंड वसूल करणार आहे. रेल्वेच्या या नव्या बदलामुळे आता प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

प्रवासादरम्यान तिकिटाविना पकडले गेल्यास आणि कॅश नसेल, अशावेळी डिजिटल पेमेंट करून तुरुंगात जाणे टाळू शकता येईल. यासाठी रेल्वे तिकीट तपासनीस कर्मचाऱ्यांना हँडहोल्ड टर्मिनल मशीन पुरवणार आहे.

indian railways irctc rpf caught 21 people in ac coach without tickets from bhagalpur district of bihar
रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करताय? मग ‘हा’ VIDEO पाहाच, तुम्हालाही भरावा लागू शकतो ‘इतका’ दंड
Shiv Panvel Highway, Accident, Accident on Shiv Panvel Highway, Ola App Passengers, Raises Safety Concerns, ola drivers, ola cab, marathi news, panvel news, panvel, accident news,
शीव-पनवेल महामार्गावरील रात्रीच्यावेळी प्रवास सुरक्षित आहे का ?
Men travel in womens coaches Safety of women passengers of air-conditioned local at risk
मुंबई : महिला डब्यातून पुरुषांचा प्रवास, वातानुकूलित लोकलच्या महिला प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर
रेल्वे सुसाट…! गेल्या वर्षभरात साडेपाच कोटी प्रवासी अन् फुकट्या प्रवाशांना २७ कोटींचा दंड

देशातील अनेक स्थानकांवरील तिकीट

तिकीट तपासनीस कर्मचाऱ्यांपर्यंत हँडहोल्ड टर्मिनल मशीन्सही पोहोचल्या आहेत. इतर ठिकाणीही ते लवकरच सुरू करण्याचे काम सुरू आहे. याद्वारे सर्व टीटीई विना तिकीट प्रवास करणाऱ्या कोणत्याही प्रवाशाकडून ऑनलाइन दंड वसूल करू शकतील. यासाठी प्रवाशाला त्याच्या मोबाइलमधील QR कोड स्कॅन करावा लागेल, यामुळे रेल्वेच्या ऑनलाइन व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल.

याशिवाय रेल्वे आता तिकीट काउंटरवर युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) पेमेंट प्लॅटफॉर्मद्वारे क्यूआर कोड स्कॅन करत तिकीट काढण्याची सुविधा सुरू करेल, तिकीट काउंटरवर क्यूआर स्कॅनिंग सुविधेमुळे प्रवासी तिकिटांचे पैसे ऑनलाइन भरू शकतील. त्यामुळे बरोबर पैसे बाळगण्याची गरज भासणार आहे. प्रवासी UPI, PhonePe, GooglePay सारख्या ॲप्समधून ऑनलाइन तिकीट काढू शकतील. याशिवाय पार्किंग आणि फूड काउंटरवर क्यूआर कोडची सुविधाही दिली जात आहे.