Shocking News: अखंड सौभाग्य आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी स्त्रिया करवाचौथचा व्रत करतात. नटून थटून उपवास करून महिला नवऱ्याच्या दीर्घ आयुष्याची देवाकडे प्रार्थना करतात. पण या शुभ दिनी एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

करवा चौथलाच संपवलं जीवन (Karwa Chauth Suicide)

एका दुर्दैवी घटनेत, २५ वर्षांच्या महिलेनं करवा चौथच्या सणासाठी साडी न मिळाल्यामुळे नवऱ्याशी झालेल्या वादानंतर आत्महत्या केली. त्या महिलेचं नाव बबली होतं आणि तिचं लग्न धर्मपालशी फक्त १० महिन्यांपूर्वी झालं होतं. FPJ च्या वृत्तानुसार, बबलीनं करवा चौथ साजरा करण्यासाठी नवी साडी हवी अशी इच्छा व्यक्त केली होती. पण नवऱ्याने ती मागणी नाकारल्याने दोघांमध्ये वाद झाला. हा वाद वाढत गेला आणि नंतर बबलीनं आत्महत्या केली. काही वेळाने ती घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर या @TrueStoryUP अकाउंटवरून ही बातमी पोस्ट झाली. पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, “उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये करवा चौथसाठी साडी न मिळाल्याने नवऱ्याशी वाद झाल्यावर बबली (२५) एवढ्या रागात आली की तिने गळफास घेतला. धर्मपाल आणि तिचं लग्न होऊन फक्त १० महिने झाले होते.”

कुटुंबीय आणि शेजारी या अचानक घडलेल्या घटनेने थक्क झाले. तात्काळ अधिकाऱ्यांना खबर देण्यात आली आणि पोलिस घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

प्रारंभिक चौकशीत असे सूचित होते की वादामुळे बबलीचा राग आणि निराशा तिने ही कठोर पावलं उचलण्यास कारणीभूत ठरली असावी. बबलीच्या अचानक मृत्यूने शेजारील परिसरात धक्का दिला असून, जोडप्यांमध्ये करवा चौथच्या सणाच्या दबावावर चर्चा सुरू झाली आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, “तो किती वाईट माणूस असेल, त्याला साडी विकत घेणंही परवड नव्हतं, मग त्याने लग्न का केले? प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असतं की करवा चौथला नवीन कपडे घालावेत.” तर दुसऱ्यानं “अशा कारणावरून आपलं जीवन संपवणं किती धक्कादायक गोष्ट आहे ही” अशी कमेंट केली.

दरम्यान याचवेळी ३५ वर्षांच्या महिलेचा करवा चौथच्या दिवशी नवऱ्यासोबत बाजारात जाताना दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. हा भयानक अपघात उत्तर प्रदेशच्या हापूर जिल्ह्यातील गुलाओथी बाजारात झाला. ते दोघे बाईकवर जात होते, तेव्हा एका ट्रकने त्यांना धडक दिली.

साक्षीदारांनी सांगितले की अपघात इतका भयानक होता की महिलेला गंभीर जखमा झाल्या आणि रस्त्यावर पडल्यावर तिचं हृदय काही क्षणांसाठी चालू होत राहिलं. महिला घटनास्थळीच मृत्यू पावली, तर तिच्या नवऱ्याला अनेक जखमा झाल्या आहेत आणि सध्या तो रुग्णालयात आहे.