राज्यात अतिवृष्टीने गुरुवारी हाहाकार माजवला. चिपळूण, महाडला पुराने वेढले असून, त्यात शेकडो नागरिक अडकले आहेत. उल्हास नदीच्या पुरामुळे बदलापूरसह कल्याण तालुक्यातील अनेक गावे जलमय झाली. कोल्हापूरसह पश्चिाम महाराष्ट्रातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. विदर्भातही अतिवृष्टीने दाणादाण उडवली. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका चिपळूणला बसला असून त्याचबरोबर रायगड जिल्ह्यालाही अतिवृष्टीने झोडपले. कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात घाट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीने अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आणि काही भागांत रस्ते पाण्याखाली गेल्याने दोन्ही प्रकारची वाहतूक ठप्प झाल्याचं पहायला मिळालं. एकीकडे कोकणवर आस्मानी संकट आलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षांनी पोस्ट केलेल्या फोटोमुळे गौरसमज निर्माण होऊन अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना ट्रोल केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झालं असं की राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष असणाऱ्या फौजीया खान यांनी ईदनिमित्त (२१ जुलै २०२१ रोजी) आपल्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद वापर, खासदार श्रीनिवास पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, वंदना चव्हाण आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. या सर्वांसोबतचा फोटो काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फौजीया यांनी ट्विट केला.

हा मूळ फोटो २१ जुलैचा आहे. सुप्रिया सुळे यांनी हा फोटो २१ जुलै रोजी रात्री आपल्या फेसबुक पेजवरुन शेअर केला होता. या फोटोचा कोकणतील पुराशी संबंध जोडला जात असली तरी हा फोटो महाराष्ट्रातील नसून फौजीया खान यांच्या दिल्लीतील निवासस्थानामधील आहे. सर्व खासदार मागील आठवड्यापासून पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. त्यात राष्ट्रवादीच्या खासदारांचाही समावेश आहे. मात्र फौजीया खान यांनी नेमका हा फोटो कोकणात अतीवृष्टी झाली त्या दिवशी म्हणजेच २२ जुलै रोजी शेअर केला आणि अनेकांना हा कार्यक्रम काल आयोजित करण्यात आला असा अनेकांचा संभ्रम झाला. बुधवारच्या या फोटोचा संबंध अनेकांनी कोकणतील पुराशी म्हणजेच गुरुवारी आलेल्या अतीवृष्टीशी जोडला आणि राष्ट्रवादीवर टीका केली.

एकीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली असतानाच दुसरीकडे सत्तेत असणाऱ्या घटक पक्षातील नेत्यांनी ईदनिमित्त स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे पाहून अनेकांनी या ट्विटखाली संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे हा फोटो २१ तारखेचा असला तरी तो महाराष्ट्रीत अनेक भागांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाल्याच्या दिवशीच सायंकाळी पोस्ट केल्याने अनेकांनी याचा संबंध पुराशी सोडला. पाहुयात याच ट्विट खालील काही कमेंट्स…

१)

२)

३)

४)

५) एकदा कोकणकडे बघा

६) तुम्ही पार्ट्या करा

७) कोकणबरोबर कायम दुजाभाव होतो

८) लोक उपाशी मेले तिकडे पुरामध्ये आणि

९) आज कोकवासीयांसाठी का नाही धडपडू शकत

१०) लाज वाटत नाही

११) ही नाटकं बरी सुचतायत

१२) हे लक्षात राहील

१३) तुम्ही तर जनतेच्या आयुष्याचा हसू करून ठेवलंय

इतकच नाही तर भाजपानेही यासंदर्भात ट्विटवरुन टीका केलीय. फौजीया यांनी केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत मुंबई भाजपाने राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला लगावला आहे. “कोकण बुडत असताना राज्यकर्ते मात्र पार्ट्या झोडत होते… संवेदनशीलपणाचा कळस,” अशा कॅप्शनसहीत मुंबई भाजपाने हा फोटो शेअर केलाय.

दरम्यान या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमावरुन वाद सुरु असला तरी दुसरीकडे आजही राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये २३ जुलैला मुसळधार पावसाची शक्यता असून, त्यानंतरही दोन दिवस पाऊस कायम राहणार आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांत आणखी तीन ते चार दिवस मुसळधारांचा अंदाज आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांतील घाटक्षेत्रांत २३ जुलैला मुसळधार आणि त्यानंतर तीन दिवस पाऊस कायम राहणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kokan massive rainfall ncp leaders along with sharad pawar supriya sule photo of eid party goes viral people slams leaders scsg
First published on: 23-07-2021 at 07:46 IST