Diva Ratnagiri Passenger Train :आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झालेल्या कोकणातील चाकरमान्यांनी कोकणात जाण्यासाठी एकच गर्दी केलेली बघायला मिळाली. दिवा रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी असून शनिवार पासूनच चाकरमानी आपल्या गावाकडे रवाना होतायत. मिळेल त्या वाहनांनी गावी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. मुंबई ठाणे परिसरातून बसेसही रवाना करण्यात आल्यात. रेल्वेने गाड्या वाढवल्या असल्या तरी त्याही कमी पडल्याचं दिसून येतंय.. मंगळवारी गणपती आगमन होत असताना दोन ते तीन दिवस आधीच चाकरमानी गावी जात आसल्याने प्रचंड गर्दी झाल्याचं दिसून येतंय..

गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कोकणात जाणाऱ्या सर्वच ट्रेन ३ ते ४ तास उशिरानं धावत आहेत. त्यामुळे दादर, ठाणे, दिवा स्थानकांत प्रवाशांची गर्दी वाढू लागलीये. मध्य रेल्वेचंही वेळापत्रक कोलमडलंय..रेल्वे वाहतूक खोळंबल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचं पाहिला मिळालं. दरम्यान याच भयंकर गर्दीचा दिवा आणि पनवेल स्टेशनवरचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल.

पाहा व्हिडीओ दिवा स्टेशनवर गर्दी

पनवेल स्टेशनवर प्रचंड गर्दी

हेही वाचा >> Shocking: आई शेतावर गेली, घरी चिमुकल्यानं इंजेक्शनच्या ८ सुया गिळल्या; २ वर्षाच्या मुलाचा अखेर…

यंदा गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर कोकणरेल्वेने प्रथमच दिवा ते रत्नागिरी दिवा अशी मेमू ट्रेन सुरू केलीय. १३ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या मेमु सेवेला कोकणातील चाकरमानी यांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. दिवा स्थानकातून रवाना होण्याआधी फलाटात शिरतानांची ही दृश्य आहेत

मुंबई-पुणे मार्गावर वाहनांच्या रांगा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर वाहनांच्या ४ ते ५ किलोमीटर रांगा लागल्याने चाकरमन्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. खालापूर टोल नाका ते कुंभवली पर्यंत ४ ते ५ किलोमीटरपर्यंत हलक्या आणि जड वाहनांच्या रांगा लागल्यात. गणेशोत्सव आणि विकेंडकरिता मुंबई, ठाणे, नवी मुंबईहून पुणे, कोल्हापूरहून कोकणात, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात गणेश भक्त आणि पर्यटक निघाल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वे वाहतूक कोंडी झालीय.