Viral video: लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान…या लावणीच्या माध्यमातून अनेक अदाकारांनी भल्याभल्यांना पायातील घुंगराच्या तालावर नाचवलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून लावणी महाराष्ट्रातील लोकांचं मनोरंजन करत आली आहे. अलीकडच्या काळात लावणी देशातच नाही तर परदेशातही पोहोचली आहे. विदेशातील अनेक नृत्यांगणा महाराष्ट्रात येऊन लावणी शिकतात, तिचा अभ्यास करतात. काळानुसार लावणी बदलत गेली. समृद्ध होत गेली. अलीकडच्या काळात तर लावणी थेट डिजेवर सुद्धा वाजत आहे. अशाच काही कोरियन तरुणींची जबरदस्त लावणी सध्या व्हायरल होत आहे. या तरुणींचा व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घालत आहे.

भारतातही ‘के ड्रामा’ आवडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरियन ड्रामा आणि के-पॉप बँड्सचे असंख्य चाहते आहेत. दक्षिण कोरियातील ड्रामा आणि गाणी अत्यंत आवडीने इथे पाहिले आणि ऐकले जातात. पण कोरियाच्या भूमीवर मराठमोळी लावणी सादर केल्याची तुम्ही कधी कल्पना केली का? ही कल्पना ऐकायला जितकी सुंदर वाटतेय, तितकीच सुंदर ती पहायलाही वाटतेय. मराठी अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना अदिती भागवतने ही कमाल केली आहे. दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेऊलमध्ये चक्क कोरियन तरुणींनी नऊवारी साडी नेसून लावणी सादर केली आहे.

‘मला लागली कुणाची उचकी..’ या गाण्यावर या तरुणींनी ही भन्नाट अशी लावणी सादर केली आहे. यावेळी त्या फक्त लावणी करत नाहीयेत तर त्यांच्या चेहऱ्यावरच्या आदाही आपल्याला भुरळ घालत आहेत. लावणीच्या बोलाप्रमाणे या कोरियन तरुणी आपले हावभाव बदलत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कायद्याचा धाक का नाही उरला? धावत्या कारवर तरुणांची हुल्लडबाजी; VIDEO पाहून नेटकरी संतापले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ मराठी अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना aditibhagwat1 हीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत दोन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि २२ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. यावर नेटकरीही भरभरून कमेंट करत आहेत. यावेळी एका युजरने म्हंटलं, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती सातासमुद्रापार गेली. तर दुसऱ्या युजरने कमेंट केली “जबरदस्त लावणीचा ठसका”