Leopard Saves Prey from Hyena: जंगलातील प्रत्येक शिकाऱ्याची खरी कसोटी ही फक्त शिकार करण्यात नाही, तर त्या शिकारीचं रक्षण करण्यातही असते. कारण- जंगलात फक्त मोठे शिकारीच नाहीत, तर तरस आणि जंगली कुत्र्यांसारखे भक्षकही कायम दबा धरून बसलेले असतात. हे शिकारी कधीही झुंडीनं येतात आणि दुसऱ्याची शिकार हिसकावून गायब होतात. म्हणूनच जो आपला शिकार वाचवू शकतो, तोच खरा ‘जंगलाच्या सिंहासनावरचा राजा’ ठरतो आणि नेमकी याच गोष्टीची प्रचिती पटवून देणारं काहीसं थरारक दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालंय, ज्यात एक बिबट्या आणि तरस यांच्यात शिकारीसाठी जबरदस्त झुंज दिसते.

जंगलातील शिकार म्हणजे फक्त पोट भरण्याचं साधन नाही, तर जगण्यासाठीची खरी लढाई असते. कारण- प्रत्येक पावलावर दबा धरून बसलेला असतो दुसरा शिकारी… तसाच एक थरारक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे, ज्यात एका क्षणाच्या चुकीमुळे बिबट्याचा जीव संकटात आला होता. पण, पुढच्याच क्षणी जे घडलं, ते पाहून लाखो लोक थक्क झाले.

चूक झाली आणि संधी मिळाली…

व्हिडीओमध्ये दिसतंय की, बिबट्यानं नुकतंच एका हरणाला ठार केलं आणि तो निवांतपणे ते झाडावर बसून खात असतो; पण अचानक त्याच्या तोंडातून शिकार घसरते आणि धडाम करीत जमिनीवर कोसळते. हा क्षण म्हणजेच तरसाला आयती संधी! काही क्षणांतच तो तिथे हजर होतो आणि शिकार उचलण्यासाठी सज्ज होतो.

पण इथेच घडतं उलटं!

तरस समोर येताच बिबट्या विजेच्या वेगानं खाली झेपावतो. क्षणाचाही विलंब न लावता तो शिकार पुन्हा आपल्या जबड्यात घट्ट पकडतो. तो क्षण पाहून लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. कारण- इतक्या वेगानं प्रतिक्रिया देणं म्हणजे खरंच जंगलाच्या राजाची ताकद. तरसाला काहीही संधी न देता, बिबट्या पुन्हा झाडावर चढतो आणि आपल्या जेवणात मग्न होतो.

जंगलाचा खरा बादशहा

हा व्हिडीओ MalaMala Game Reserve या यूट्यूब अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. लाखो लोकांनी तो पाहिला आणि बिबट्याच्या चपळाईचं कौतुक केलं आहे. काहींनी तर त्याला ‘Real King of the Jungle’ म्हटलं आहे. पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झालेलं हे दृश्य आता प्रचंड व्हायरल होत असून, पाहणाऱ्यांच्या श्वासाचा ठोका चुकवतो आहे.

एक चूक बिबट्याला जीवावर बेतू शकली असती; पण त्यानं दाखवलेली चपळाई सिद्ध करते की, जंगलात टिकण्यासाठी धाडस, ताकद तीक्ष्ण नजर व विजेच्या वेगाची चपळाई हवीच.

येथे पाहा व्हिडीओ

हा VIDEO पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल – खराखुरा बादशहा बिबट्याच!