Australia Won ICC Cricket World Cup 2023 against India: विश्वचषक २०२३चा अतिंम सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पार पडला आहे. या रोमांचक सामान्यात भारताचा ६ गडी राखून ऑस्ट्रेलियाने पराभव केला आणि सहाव्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरले. पण भारतीयांचा विजेतेपदाचं स्वप्न भंग पावले. गेल्या दीड महिन्यापासून सर्मोत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय संघालाच्या पदरी मात्र निराशी आलीय. भारतीय संघाचा पराभव पाहून अनेक भारतीयांनीही हळहळ व्यक्त केली. भारतीय संघाचा परभावमुळे निराश झालेल्या चाहत्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशाच एका व्हिडीओमध्ये एक चिमुकली ढसा ढसा रडताना दिसत आहे. तिचा निरागसपणा पाहून अनेकांच्या डोळ्या अश्रू दाटून येत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली भारतीय संघाचा पराभव झाल्यामुळे अत्यंत दुखी झाली आहे. चिमुकली तिच्या आईला रडत रडत सांगते आहे की, “आई, भारत हारला” चिमुकलीची आई तिला समावते की, काही हरकत नाही. पुढच्यावेळी जिंकेल.

चिमुकली म्हणते की, “पुढची वेळ ट्रॉफी नसते ना. असे कसे झाले?

तिची आई तिला समजावते की, “काही हरकत नाही. भारत पुढच्यावेळी नक्की जिंकेल. कोहली पुढच्यावेळी चांगला खेळेल.”

चिमुकली रडत म्हणते,”यावेळी आपण का हारलो. असे नव्हते व्हायला पाहिजे.”
त्यावर तिला आई समजावते की, “भारताने सर्व मॅच जिंकल्या आहेत. एक मॅच हारली तर काही हरकत नाही. पुढच्यावेळी जिंकू आपण. रडू नको. हारले तरी काही हरकत नाही.”

चिमुकली त्यानंतर तिच्या आजीकडे रडत जाते आणि तिच्या गळ्यात पडून रडते. तिची आजी तिला रडू नको असे सांगताना दिसते.

हेही वाचा – कोणी म्हणे ‘ Scorpito’ तर कोणी ‘Scoriksha’: व्यक्तीने जुगाड करून रिक्षाची बनवली स्कॉर्पिओ; पाहा Viral Video

हेही वाचा – कसे बनवले जातात आपटी बॉम्ब? फटाका तयार करतानाचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “हे खूप धोकादायक आहे”

चिमुकलीचा व्हिडीओ पाहून सर्वजण भावूक झाले आहे. ह्रदयद्रावक व्हिडीओ पाहून सर्वांना आपले अश्रू रोखणे अवघड जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओवर एकाने कमेंट केली की, “लहान मुलेच काय मोठ्यांनाही रडू येतयं?” दुसऱ्याने लिहिले, “मी आशा करतो पुढच्यावेळी भारत जिंकेल.” तिसरा म्हणाला, क्रिकेट हा फक्त खेळ नाही तर भारतीयांसाठी एक भावना आहे”