भारतीय खाद्यपदार्थ हे जगभरात प्रसिद्ध आहेत. कुठे ते मसालेदार चवीसाठी, तर कुठे त्याच्या आंबट-गोड चवीसाठी ओळखले जातात. जेव्हा जेव्हा परदेशी लोक भारतात येतात तेव्हा ते भारतीय पदार्थांची चव चाखण्याची संधी सोडत नाहीत. सध्या सोशल मीडियावर अशाच एका परदेशातील चिमुकलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पहिल्यांदाच भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहे. हे पदार्थ खाल्ल्यानंतर चिमुकलीने दिलेली एक्स्प्रेशन्स आता नेटिझन्सची मने जिंकत आहेत. यामुळे तिचा हा क्यूट व्हिडीओ खूप चर्चेत आहे.
न्यू यॉर्क शहरात राहणारी एक आई तिच्या गोंडस चिमुकलीला एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये जेवायला घेऊन गेली. जिथे या चिमुकलीने पहिल्यांदा वेगवेगळ्या भारतीय पदार्थांची चव चाखली. या वेळी तिची आई ती खातानाचे व्हिडीओ रेकॉर्ड करत होती. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता, चिमुकलीने पापड, पाणीपुरीपासून ते डाळ तडकापर्यंत अनेक पदार्थांचा आस्वाद घेतला. हे पदार्थ खाताना चिमुकलीने दिलेले एक्स्प्रेशन आता अनेकांना खूप आवडले आहेत. हा व्हिडीओ चिमुकलीची आई Bridget Coolick ने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये दिसणार्या या गोंडस चिमुरडीचे नाव सोफिया आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सोफिया आधी पापड खाते, नंतर ती पाणीपुरी खाते, पण ती तिच्या हातातून पडते. यानंतर सोफियाने राईस आणि नानसोबत दाल तडका ट्राय केला. व्हिडीओतील चिमुकलीच्या एक्स्प्रेशनवरून तिला हे पदार्थ आवडल्याचा अंदाज केला जात आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
यात चिमुकलीने भारतीय पदार्थ खाल्ल्यानंतर दिलेले एक्स्प्रेशन युजर्सना फार आवडले असून युजर्स त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. अनेक युजर्सनी भारतीय खाद्यपदार्थांची प्रशंसा करत सोफियावर त्यांचे प्रेम व्यक्त केले आहे. या व्हिडीओला आता खूप पसंती मिळाली आहे.