Gukesh vs magnus video: भारताचा १८ वर्षीय बुद्धिबळपटू डी गुकेश आता बुद्धिबळाचा बादशहा आहे. सध्याचा विश्वविजेता डोम्माराजू गुकेश याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत एक सनसनाटी विजय नोंदवला आहे. आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच, गुकेशने शास्त्रीय वेळेच्या नियंत्रणाखाली माजी विश्वविजेता मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. या विजयाने एकीकडे भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात जल्लोष असताना, दुसरीकडे पराभवानंतर कार्लसनच्या अत्यंत अनपेक्षित प्रतिक्रियेचा धक्कादायक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
दोन वर्षांत दुसऱ्यांदा, एका भारतीयाने नॉर्वे बुद्धिबळात मॅग्नस कार्लसनला हरवून पहिला विजय नोंदवला आहे. आठवड्यापूर्वीच मॅग्नस कार्लसनने नॉर्वे बुद्धिबळाच्या पहिल्या फेरीत विश्वविजेता डी गुकेशला हार मानण्यास भाग पाडले होते. त्यानंतर गुकेशने सोशल मीडियावर एक पोस्ट करत, जेव्हा तुम्ही राजाच्या जवळ जाता तेव्हा अजिबात चुकू नका असं म्हटलं होतं. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा स्टॅव्हॅन्गर येथे गुकेशने नेमके हेच केले. १९ वर्षीय डी गुकेशने जगातील नंबर १ वर विजय मिळवण्यासाठी ६२ चाली खेळल्या आणि त्याला पराभूत केले. या सामन्यात गुकेशकडून पराभव झाल्यानंतर मॅग्नस कार्लसनची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. त्याच वेळी, गुकेश खूप शांत दिसत होता
हा पराभव मॅग्नस कार्लसनला चांगलाच झोंबला. खेळ संपल्यानंतर, जेव्हा त्याला आपली चूक आणि झालेला पराभव लक्षात आला, तेव्हा तो रागाने खेळ ठेवलेल्या टेबलावर जोरदार मुक्का मारला. त्याच्या या कृतीमुळे टेबलावरील बुद्धिबळाचे काही मोहरेही खाली पडले. कार्लसनची ही प्रतिक्रिया पाहून खुद्द गुकेशही काही क्षण स्तब्ध झाला होता. कार्लसनच्या रागाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. यावेळी गुकेशला हा प्रकार अजिबात पटलेला नाही त्याच्या चेहऱ्यावरुन दिसत आहे. त्यामुळे तो तिथून उठून गेल्याचं दिसत आहे.
पाहा व्हिडीओ

काय आहे डी गुकेशचं पूर्ण नाव?
डी गुकेशचं पूर्ण नाव गुकेश दोम्मराजू आहे. गुकेशचा जन्म २९ मे २००६ मध्ये चेन्नईत झाला. त्याच्या वडिलांचं नाव रजनीकांत आहे आणि ते कान, नाक आणि घश्याचे सर्जन आहेत. तर त्याची आई पद्मा या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत. गुकेशने वयाच्या सातव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास सुरूवात केली. बुद्धिबळसाठी शाळा सोडणाऱ्या गुकेशसाठी विश्वेविजेतेपद जिंकणे हा महत्त्वाचा क्षण होता. आपल्या लेकाने केलेल्या कामिगिरीमुळे हा क्षण त्याच्या वडिलांसाठी आभाळ ठेगणं करणारा ठरला आहे. एकेकाळी गुकेशच्या वडिलांनी मुलाच्या भविष्यासाठी आपलं करिअर पणाला लावलं होतं.