लग्न असो वा पार्टी, डीजेशिवाय कोणताही कार्यक्रम अपूर्ण वाटतो. हल्ली मिरवणूक, वाढदिवसाच्या कार्यक्रमातही डीजेचा दणदणाट ऐकायला मिळतो. छोटा हत्ती किंवा टेम्पो अशा वाहनांवर हा डीजे लावला जातो. मोठ-मोठे स्पीकर्स आणि रंगीबेरंगी लायटिंग्सच्या मदतीने हा डीजे सजवला जातो. यात लग्नाचा मोसम जवळ आल्याने असे अनेक डीजे तुम्हाला पाहायला मिळतील. पण, सध्या सोशल मीडियावर एक भलामोठा बाहुबली डीजे पाहायला मिळतोय. या डीजेचा आकार आणि आवाज दोन्ही इतका भयानक आहे की, जो पाहून अनेकांना धडकी भरली आहे. या भल्यामोठ्या बाहुबली डीजेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका ट्रकच्या मागच्या बाजूस बरेच स्पीकर एकत्र करून जोडले आहेत. डीजेवरील इतके स्पीकर एकाचवेळी वाजल्यानंतर जो काही आवाज निघतो तो ऐकून कोणालाही धडकी भरेल. यावेळी लोक त्याचा व्हिडीओ बनवण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाही.

या जबरदस्त डीजेच्या व्हिडीओ @dj_raj_kamal_basti या इन्स्टाग्राम हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे. अनेकजण असा भलामोठा डीजे पाहिल्यानंतर कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. डीजेचा आकार पाहून अनेकजण कमेंट्समध्ये म्हणतायत की, भाऊ, याच्या आवाजाने पृथ्वी हादरेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर एका युजरने लिहिले की, जे बनवले आहे ते चांगले आहे… पण, ते कोणत्या रस्त्यावर धावणार? आणखी एका युजरने लिहिले की, पृथ्वी हादरेल असे वाटतेय. यावर इतर युजर्सनी म्हटले की, हा डीजे नसून डीजेचा बाप आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून सांगा.