२०२५ हे वर्ष सुरू झालं आणि १४ जानेवारी २०२५ रोजी सर्वत्र मकर संक्रांत साजरी केली गेली. या दिवशी पतंग उडवण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच उत्सुक असतात. सगळेच या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. कुठे टेरेसवर जाऊन, तर कुठे छतावर जाऊन अनेकजण पतंग उडवतात आणि या दिवसाचा आनंद लुटतात.

मकर संक्रांतीच्या या सणादिवशी पतंग उडवताना केलेली चढाओढ, तसंच स्पर्धात्मक वातावरण तयार होतं. कोण हरेल कोण जिंकेल याची उत्सुकता सगळ्यांच्या मनात असते. सध्या पतंग उडवतानाचे आणि हा सण साजरा करत आनंद लुटणाऱ्या अनेकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण, अशातच आता असा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे, ज्यात पतंग पकडण्यासाठी एक युवक चक्क ट्रकवरच चढला. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच पोट धरून हसाल.

हेही वाचा… कहरच! चालत्या ट्रेनमध्ये दोन महिलांनी अक्षरश: मर्यादा ओलांडली, साड्या फाटल्या तरी थांबल्या नाही; धक्कादायक VIDEO व्हायरल

…पण पठ्ठ्याने पतंग सोडली नाही

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुण भररस्त्यात गाड्यांच्या गदारोळात एका ट्रकवर चढलेला दिसतोय. झाडावर अडकलेली पतंग पकडण्यासाठी त्याने हा प्रताप केल्याचं व्हिडीओतून दिसून येतंय. ट्रकवर चढून पठ्ठ्याने झाडावरील पतंग काढली. ट्रकवर चढल्यामुळे ट्रक तिथेच थांबवण्यात आला आणि मागे गाड्यांच्या रांगा लागला पण त्याला काही पतंग काढण्याचा मोह आवरला नाही.

मकरसंक्रांतीनंतर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @heypuneofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “पतंग पकडण्यासाठी पुण्यातील युवक चढला थेट ट्रॅफिकमधील ट्रकवर” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तर व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ५० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. यादरम्यान, हा व्हिडीओ पुण्याचा असून सोशल मीडियावर तुफान गाजतोय.

हेही वाचा… काळ आला होता पण वेळ आली नव्हती! त्याने तिला जबरदस्तीने व्हॅनमध्ये बसवलं अन्…, अपहरणाचा धक्कादायक VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “पतंगाच्या मांज्याने कोणाचा गळा कापू नये म्हणून चढला” तर दुसऱ्याने “पुणेकर ऑन टॉप” अशी कमेंट केली.