काही वर्षांपासून वीजबिलांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. एक काळ असा होता की, ३०० ते ४०० रुपयांच्या आसपास जरी बिल आलं तरी खूप जास्त वाटायचं; पण आता तर अनेकांच्या घरात १२०० ते २००० रुपयांपर्यंत बिल येताना दिसतंय. त्यावर अनेकांनी अनेकदा तक्रारी केल्या, काही ठिकाणी आंदोलनंही झाली; पण फारसा फरक जाणवताना दिसत नाही. अशा परिस्थितीत एका तरुणानं भन्नाट तोडगा शोधून काढला आहे; त्यानं जुगाड करून चक्क विजेशिवाय चालणारा पंखा तयार केला आहे. पण, तरुणाचा हा जुगाड पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

पंखा फिरण्यासाठी एका मोटरची गरज लागते. मोटर फिरताच पंख्याच्या पाती फिरू लागतात आणि मग आपल्याला थंड हवा मिळते. पण, सतत फिरणाऱ्या पंख्यामुळे आपलं वीजबिलही जास्त येतं. अशा परिस्थितीत तरुणानं जुगाड करून असा एक पंखा तयार केला आहे की, ज्याला फिरण्यासाठी ना मोटरची गरज लागते ना विजेची. या दोन्ही गोष्टींशिवाय पंखा हातानं आरामात फिरू लागतो. पण, या पंख्यातून हवा खाण्यासाठी दोन व्यक्तींची गरज लागते.

हेही वाचा -नळातून येणाऱ्या पाण्याचा प्रेशर वाढवण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड; पाइपवर अडकवली प्लास्टिकची बाटली अन्…; पाहा Video

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर sahabajgorwal नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, देसी जुगाड! या व्हिडीओला आतापर्यंत दोन लाख ६० हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर, खूप लोकांनी कमेंट्सही केल्या आहेत. काहींना हा जुगाड आवडला; तर काहींनी याला बकवास म्हटलेय. एका युजरनं लिहिलंय की, सर्व गियरची कमाल आहे. दुसर्‍यानं लिहिलंय की, तुम्ही स्वतःला डिफ्लेटेड हवा खाऊन दाखवा. तिसर्‍यानं लिहिलंय की, काय कारागिरी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.