scorecardresearch

Premium

याला म्हणतात मृत्यूशी खेळणे! कोणत्याही आधाराशिवाय व्यक्ती उंच इमारतीवरून करतेय स्टंटबाजी; Video पाहून पोटात येईल गोळा

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कोणत्याही आधाराशिवाय उंचावरून उड्या मारत स्टंटबाजी करतोय, जे पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

man jumped without support very dangerous sight was seen video goes viral
याला म्हणतात मृत्यूशी खेळणे! कोणत्याही आधाराशिवाय व्यक्ती उंच इमारतीवरुन करतोय स्टंटबाजी, Video पाहून पोटात येईल गोळा (photo- bodybuilder_viral_123 instagram

Stunt Viral Video: काही लोक जीवाची पर्वा न करता, एकदम खतरनाक स्टंटबाजी करताना दिसतात. काही वेळा हे स्टंट पाहताना आपल्या पोटात अक्षरश: गोळा येतो. मात्र, स्टंटमॅन अगदी आरामात, सहजपणे हे स्टंट करीत असतो. अशाच एका खतरनाक स्टंटबाजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो पाहून तुमच्याही काळजात एकदम धस्स होईल.

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अशा एका धोकादायक ठिकाणाहून कशाचाही आधार न घेता उड्या मारतेय; ज्या ठिकाणावर उभं राहून खाली वाकून बघण्याचीही कोणाची हिंमत होणार नाही. हा स्टंट इतका धोकादायक आहे की, थोडीशीही चूक व्यक्तीच्या जीवावर बेतू शकते.

Reverse fatty liver easily What to eat, what not
मद्यपान न करताही यकृताला सूज येण्याचा धोका! डॉक्टर सांगतात, आहार कसा असावा? काय खावं, काय टाळावं?
Benefits Of Walking backwards fitness trend strengthens muscles and improves brain function Exercise Routine Beginners
Back Walk: चालण्याच्या पद्धतीत केलेला ‘हा’ छोटा बदल, स्नायूंची शक्ती व मेंदूची तीक्ष्णता वाढवायला करतो मोठी मदत
Can Eating 100 Grams Beetroot Cure Cancer Does Beet Boost Blood Sugar Diabetes Care Constipation Remedies Check Benefits
१०० ग्रॅम बीटरूटच्या पोटात दडलंय काय? खाल्ल्याने कॅन्सर बरा होतो का? मधुमेह असल्यास खावं का? प्रश्न सोडवुया..
harish mehta
रामलीलेत हनुमानाचे पात्र साकारणाऱ्या व्यक्तीला आला हृदयविकाराचा झटका, अन्…; VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती कोणत्याही आधाराशिवाय बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या इथे ठेवलेल्या लोखंडी शिडीवरून थेट जेसीबीवर उडी घेते. त्यानंतर पुन्हा त्याखालच्या एक जेबीसी कारला लटकते आणि शेवटी ती जमिनीवर ठेवलेल्या दोन दगडांवर अशा प्रकारे उडी मारते की, ज्याचा आपण कधी विचारही करू शकत नाही. एखाद्या कमकुवत हृदय असलेल्या व्यक्तीनं हे पाहिलं तर नक्कीच त्याला हृदयविकाराचा झटका येईल. कारण- हा स्टंटमॅन अशा ठिकाणाहून उडी घेतो की, जिथून एखादा माणूस खाली पडला तर थेट त्याचा मृत्यू होईल. पण, अनुभव अन् सराव या बाबी अशा आहेत की, ज्याच्या जोरावर व्यक्ती अनेक अशक्य गोष्टीही शक्य करता करू शकते. अशा प्रकारे या माणसानंही सरावाच्या जोरावर हे खतरनाक आणि परफेक्ट स्टंट केले आहेत.

खतरनाक स्टंटचा हा व्हिडीओ bodybuilder_viral_123 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; ज्यावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलेय की, भाऊ त्याला २१ तोफांची सलामी दिली पाहिजे. आणखी एका युजरने लिहिलेय की, याला म्हणतात मृत्यूशी खेळणं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man jumped without support very dangerous sight was seen video goes viral sjr

First published on: 06-10-2023 at 11:52 IST

संबंधित बातम्या

×